अरे देवा! माश्या बनत आहेत जिवंत झोंबी, घातक फंगसच्या हल्ल्याने वैज्ञानिक झाले हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 02:53 PM2021-03-22T14:53:35+5:302021-03-22T15:09:56+5:30

Fungus turns flies into Zombies : नुकतेच दोन फंगस शोधण्यात आले आहे. एका फंगसचं नाव आहे स्ट्रॉन्गवेलसी टिगरिने आणि दुसऱ्या फंगसचं नाव आहे स्ट्रॉन्गेलसी एसरोसा.

Newly discovered fungus turns flies into zombies | अरे देवा! माश्या बनत आहेत जिवंत झोंबी, घातक फंगसच्या हल्ल्याने वैज्ञानिक झाले हैराण!

अरे देवा! माश्या बनत आहेत जिवंत झोंबी, घातक फंगसच्या हल्ल्याने वैज्ञानिक झाले हैराण!

Next

घरात माश्या आल्यावर तर सगळेच हैराण होतात. मात्र माश्यांमुळे एका देशावर संकट आलं आहे. येथील माश्यांमध्ये एक फंगस म्हणजे संक्रमण होत आहे जे माश्यांना आतल्या आत खाणं सुररू करतं. ज्यामुळे माश्या चालत्या-फिरत्या झोंबी बनत आहेत. त्यासोबत हे फंगस नव्या माश्यांच्या शरीरावर आपला सोर्स म्हणजे बीजाणू सोडतं. जेणेकरून झोंबी संक्रमण अधिक पसरवू शकेल. चला जाणून घेऊ काय आहे हे नेमकं प्रकरण.... (Fungus turns flies into Zombies)

नुकतेच दोन फंगस शोधण्यात आले आहे. एका फंगसचं नाव आहे स्ट्रॉन्गवेलसी टिगरिने आणि दुसऱ्या फंगसचं नाव आहे स्ट्रॉन्गेलसी एसरोसा. हे घरगुती माश्यांच्या दोन प्रजातींवर हल्ला करत आहे. त्या प्रजाती आहेत कोएनोसिया टिगरिना आणि कोएनोसिया टेस्टासिया. माश्यांवर या दोन्ही नव्या फंगसच्या हल्ल्याने माश्या चालत्या-फिरत्या मृत बनतात. म्हणजे झोंबी बनतात. फंगस माश्यांच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर त्यांना आतून खातं. शरीर आतून पूर्ण खाल्ल्यावर फंगस बाहेर आल्यावर दुसऱ्या माश्यांना संक्रमित करतं. हे फंगस माश्यांचं पोट खातं.

माश्यांचे अंग खाल्ल्यांनंतर फंगस पिवळ्या रंगाचे सोर्स म्हणजे बीजाणू तयार करत आहे. या बीजाणूंच्या माध्यमातून इतर माश्याही संक्रमित होत आहेत. सर्वात वाईट बाब म्हणजे फंगस माश्यांच्या शरीरातील अवयव खातं, तरी सुद्धा माशी जिवंत राहते. कमीत कमी काही दिवसांसाठी जिवंत राहते.

This Killer Fungus Turns Flies into Zombies | KQED

फंगसच्या बीजाणूचा प्रसार माश्यांच्या प्रजनन क्रियेदरम्यान होतं. नरातून मादा माश्यांमध्ये हे फंगस पसरतं. त्यानंतर इतर माश्यांमध्ये जातं. जेव्हा या माश्या मरतात, वाळतात तेव्हा फंगस हवेतून बीजाणू आणखी पसरवतात. दोन्ही फंगसच्या बीजाणूंना लक्ष देऊन पाहिलं तर यांचा बाहेरील थर जाड असतो. कारण हे हिवाळ्यात निष्क्रिय राहतात. जसंही वातावरण सामान्य होतं तेव्हा हे पुन्हा सक्रिय होऊन माश्यांवर हल्ला करतात.

डेन्मार्कचे एमएगर आणि जॅगर्सप्रिसच्या शेतांमध्ये डच वैज्ञानिकांनी फंगसने संक्रमित माश्या पाहिल्या. या माश्या शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी दिसतात. वैज्ञानिकांनी याचा रिपोर्ट तयार केला आणि जर्नल ऑफ इन्वर्टिबेट पॅथॉलॉजीमध्ये प्रकाशित केला. हा रिपोर्ट तयार करणारे मुख्य वैज्ञानिक जॉर्जेन इलेनबर्ग म्हणाले की, आम्ही पहिल्यांदाच असं काही पाहिलंय. हा जग संपवण्यासारखा नजारा आहे.

जॉर्जेन म्हणाले की, ज्या फंगसमुळे माश्यांची ही स्थिती आहे. ते भविष्यात म्यूटेशन करून मनुष्यांनाही संक्रमित करू शकतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास महत्वाचा होता. आम्हाला या अभ्यासातून समजलं की, फंगस माश्यांना कोणत्यातरी रसायनाची नशा देतात. हे रसायन माश्यांना या स्थितीतही उडण्याची ताकद देतं. म्हणजे फंगस माश्यांच्या पोटात अवयव खात राहतं. तर माश्या काही वेळापर्यंत उडत राहतात. पोट पूर्ण फुटेपर्यंत हे सुरू राहतं.

जॉर्जेन पुढे म्हणाले की, सामान्यपणे कीटकांना खाणारे फंगस आधी एमफिटामाइनसारखं रसायन सोडतात. जेणेकरून कीटक चालत-फिरत रहावे आणि फंगस आपलं काम करत रहावं. कीटकांना हे समजतही नाही त्यांना संक्रमण झालं आहे. असंच काहीसं दोन्ही फंगसने माश्यांवर केलं आहे. 

Web Title: Newly discovered fungus turns flies into zombies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.