बाबो! नव्या नवरीने काही दिवसातच केला मोठा कारनामा, भावोजीसोबत रूममध्ये सापडली आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 12:56 PM2022-03-04T12:56:00+5:302022-03-04T12:59:32+5:30
Newly married women run away from Husband : नव्या नवरीच्या या कारनाम्यामुळे सासरच्यासोबतच माहेरच्या लोकांनाही लोकांसमोर लाजेने मान खाली घालावी लागली.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) पीलीभीतमधून एक फारच हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका नव्या नवरीने असा काही कारनामा केला की, केवळ पतीच नाही तर पूर्ण परिवाराला तोंड लपवण्यास भाग पाडलं. सूनेचा हा कारनामा पाहून सासू-सासऱ्यांनाही धक्का बसला. त्यांची सून पतीला सोडून फरार (Newly married women run away from Husband) झाली. जेव्हा तिला शोधलं गेलं तर ती तिच्या भावोजीसोबत त्याच्या घरात सापडली.
नव्या नवरीच्या या कारनाम्यामुळे सासरच्यासोबतच माहेरच्या लोकांनाही लोकांसमोर लाजेने मान खाली घालावी लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीलीभीतमध्ये एका परिवाराने ४ महिन्यांआधी आपल्या मुलाचं मोठ्या धडाक्यात लग्न केलं होतं. लग्न करून नवरी जेव्हा सासरी आली तेव्हा सासू-सासऱ्यांनी आपल्या मुलीप्रमाणे तिचं स्वागत केलं. पण त्यांना जराही अंदाज नव्हता की, जिला ते सून म्हणून घेऊ आले ती त्यांची लाज काढेल.
रिपोर्ट्सनुसार लग्नानंतर चार महिने सगळं काही चांगलं सुरू होतं. पण एक दिवस नवरी मोठा कारनामा करून गेली आणि सासर सोडून फरार झाली. घरातील सून गायब असल्याचं पाहून सासू-सासऱ्यांसोबतच पतीही हैराण झाला. जो तरूण तिला सात फेरे घेऊन सन्मानाने घरी घेऊन आला होता तिने त्याचीच लाज काढली. त्यानंतर तिचा शोध घेण्यास सुरूवात झाली. बराच शोध घेतल्यावर महिला तिच्या भावोजीच्या घरी सापडली.
यानंतर सासू-सासरे आणि महिलेच्या माहेरच्या लोकांनी तिला परत येण्यास सांगितलं तर तिने स्पष्ट नकार दिला. ही घटना बाबा कॉलनीच्या भगवंतापूर चुंगीची आहे. उपेंद्र नावाच्या तरूणाचं गोरखपूरला राहणाऱ्या संगीतासोबत ४ महिन्यांआधी लग्न झालं होतं. एक मार्चला संगीता तिच्या माहेरच्या लोकांसोबत एका धार्मिक स्थळी फिरायला गेली होती. यावेळी संधी शोधून ती संगीता फरार झाली. तिचा शोध घेतला तर ती तिच्या भावोजीच्या घरी सापडली.