बाबो! एका व्यक्तीने ३ कोटी रूपयांना खरेदी केले हे जुने शूज, पण इतकी किंमत का रे भौ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 02:22 PM2019-07-24T14:22:56+5:302019-07-24T14:30:34+5:30
काही लोक हे त्यांच्या आवडीच्या गोष्टीसाठी किती पैसे लागतील याचा अजिबात विचार करत नाहीत. त्यांना त्यांची आवडीची वस्तू मिळवणे हेच माहीत असतं, मग किंमत कितीही असो.
काही लोक हे त्यांच्या आवडीच्या गोष्टीसाठी किती पैसे लागतील याचा अजिबात विचार करत नाहीत. त्यांना त्यांची आवडीची वस्तू मिळवणे हेच माहीत असतं, मग किंमत कितीही असो. अशाच एका व्यक्तीला नाइकीचे शूज पसंत आले. पणे हे सामान्य शूज नव्हते. हे शूज १९७२ मध्ये तयार करण्यात आलेले होते. या शूजसाठी या व्यक्तीने तब्बल ३ कोटी रूपये दिले. नाही म्हणजे शौक मोठी गोष्ट असते हे माहीत आहे, पण हे जरा जास्तच आश्चर्याचं आहे ना?
Nike’s 'Moon Shoe' sells for $437,500 at Sotheby’s auction. That’s the world auction record for a pair of sneakers. Pair was bought by collector Miles Nadal who also bought all 99 shoes up for auction for $850K. (Photo: Unrah Jones) pic.twitter.com/oJJA4quhBW
— Jess Golden (@JGolden5) July 23, 2019
या शूजच्या पेअरचं नाव Nike Moon Shoes असं आहे. या शूजचा लिलाव नुकताच न्यूयॉर्कमध्ये करण्यात आला. याची किंमत ४३७, ५०० डॉलर इतकी ठेवण्यात आली होती. भारतीय करन्सीनुसार ही किंमत ३,०१,८८,३७५.०० इतकी होते.
कुणी घेतले?
कॅनडात राहणाऱ्या Miles Nadal नावाच्या बिझनेसमन व्यक्तीने हे शूज खरेदी केले. इतकेच काय तर या व्यक्तीचं एक वैयक्तिक संग्रहालय सुद्धा आहे. ते हे शूज त्यातच ठेवणार आहेत. त्यांच्याकडे १४२ अॅंटिक कारही आहेत. तर ४० जुन्या बाइक्सही आहेत. माइल्स यांचं जुन्या वस्तुंवर फार प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी या शूजसाठीही ३ कोटी रूपये दिले.
Moon Shoe नाइकी ब्रॅन्डच्या इतिहासातील एक महत्त्वाचं प्रॉडक्ट होतं. नाइकीचे को-फाउंडर बिल बोवरमॅनने हे शूज डिझाइन केले होते. हे शूज १९७२ मध्ये ऑलम्पिक दरम्यान रनर्ससाठी तयार करण्यात आले होते.
या मॉडलचे केवळ १२ शूज तयार करण्यात आले होते. माइल्स म्हणाले की, 'मला फार आनंद झाला की, शूजच्या विश्वात एक दुर्मिळ शूजची निर्मिती नाइकीने केली होती. यातून खेळांचा इतिहास, कला आणि पॉप कल्चरचं दर्शन होतं. याआधी मी शूजचे ९९ पेअर खरेदी केले होते, तेव्हा मला वाटलं होतं की, नाइकीकडे असंच एक वेगळं कलेक्शन शिल्लक आहे. तेच झालं'.
२०१७ मध्ये प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डनने साइन केलेला एक शूज विकला गेला होता. हा शूज Converese चा होता. त्यावेळी याची किंमत १९०, ३७३ डॉलर होती. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम १, ३१,३७,९२६.२९ रूपये होते. या शूजचा सर्वात जास्त किंमत मिळण्याचा रेकॉर्ड नाइकीच्या शूजने तोडला आहे.