एक असा देश जिथे गेल्या ९५ वर्षात एकाही बाळाने घेतला नाही जन्म, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 04:00 PM2024-10-07T16:00:46+5:302024-10-07T16:01:50+5:30

Interesting Facts : या देशात गेल्या ९५ वर्षात एकाही बाळाने जन्म घेतलेला नाही. याचंच कारण आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

No baby born at this place in last 95 years know the reason | एक असा देश जिथे गेल्या ९५ वर्षात एकाही बाळाने घेतला नाही जन्म, कारण...

एक असा देश जिथे गेल्या ९५ वर्षात एकाही बाळाने घेतला नाही जन्म, कारण...

Interesting Facts : पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी आपली एक खासियत आहे. अनेक ठिकाणांच्या वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टी आहेत. ज्या वाचून सगळेच अवाक् होत असतात. आज आम्ही जगातल्या अशाच एका वेगळ्या आणि खास देशाबाबत सांगणार आहोत. या देशाची नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चा होत असते. यातील एक कारण म्हणजे या देशात गेल्या ९५ वर्षात एकाही बाळाने जन्म घेतलेला नाही. याचंच कारण आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

९५ वर्षाआधी हा देश अस्तित्वात आला होता. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या देशातील नागरिकांना कधीच स्थायी नागरिकता मिळत नाही. याच देशात गेल्या ९५ वर्षात एकाही बाळाचा जन्म झालेला नाही. हा देश म्हणजे व्हॅटिकन सिटी.

जगातील सगळ्यात लहान असलेला व्हॅटिकन सिटी हा देश जगभरातील रोमन कॅटलिक ख्रिश्चन धर्म गुरूंचं घर आहे. इथे पोप यांचं शासन चालतं. तरीही या देशात एक बाळ जन्माला येत नाही. हा देश ११ फेब्रुवारी १९२९ मध्ये तयार झाला होता. हैराण करणारी बाब म्हणजे इतक्या वर्षात एक बाळ इथे जन्माला आलेलं नाही. 

असं मानलं जातं की, जगभरातील कॅथलिक चर्चा आणि कॅथलिक ख्रिश्चन लोकांची मूळं इथेच आहेत. महत्वाची बाब म्हणजे व्हॅटिकन सिटीमध्ये एकही हॉस्पिटल नाही. कारण हा देश फारच लहान आहे. या देशाचं क्षेत्रफळ एक किलोमीटर पेक्षाही कमी आहे. इटली या देशामध्येच एक हा छोटा देश बनवला आहे. 

इथे हॉस्पिटलच नसल्याने बाळांच्या जन्मासाठी डिलीव्हरी रूमही नाही. इथे नॉर्मल डिलेव्हरी होत नाही किंवा होऊ दिली जात नाही. जेव्हा एखाद्या महिलेची डिलेव्हरी जवळ येते तेव्हा येथील नियमांनुसार, बाळाला जन्म देण्यासाठी महिलेला शेजारील देश इटलीमध्ये जावं लागतं. येथील हॉस्पिटलमध्ये महिला बाळाला जन्म देऊ शकते. 

Web Title: No baby born at this place in last 95 years know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.