एक असं गाव जिथे राहतात केवळ महिला, पुरूषांना आहे बंदी; तरीही महिला होतात प्रेग्नेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 03:02 PM2024-08-09T15:02:00+5:302024-08-09T15:21:23+5:30

हे एक लहान गाव असलं तरी यात साधारण २५० महिला आपल्या मुलांसोबत राहतात.

No man can enter this village ruled only by women | एक असं गाव जिथे राहतात केवळ महिला, पुरूषांना आहे बंदी; तरीही महिला होतात प्रेग्नेंट

एक असं गाव जिथे राहतात केवळ महिला, पुरूषांना आहे बंदी; तरीही महिला होतात प्रेग्नेंट

जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांबाबत लोकांना अजूनही काही माहीत नाही. या गोष्टी खूप अवाक् करणाऱ्या आणि काही आश्चर्यचा धक्का देणाऱ्या असतात. आज आम्ही तुम्हाला आज अशाच एका गावाबाबत सांगणार आहोत जिथे केवळ महिला राहतात. या गावात पुरूषांना येण्यास बंदी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तरीही या गावातील महिला गर्भवती होतात. हे आफ्रिकेतील आहे.

आफ्रिकेच्या घनदाट जंगलांमध्ये असलेल्या या गावात पुरूषांना येण्यास बंदी आहे. १९९० मध्ये या गावात अशा महिलांनी राहण्याचा निर्णय घेतला होता ज्यांच्यावर ब्रिटीशांनी लैंगिक अत्याचार केले. आता या गावात अशाच अत्याचार झालेल्या, बाल विवाह झालेल्या, कौटुंबिक हिंसेच्या शिकार असलेल्या महिला राहतात. याच कारणामुळे या गावात पुरूषांना येण्यास बंदी आहे. 

हे एक लहान गाव असलं तरी यात साधारण २५० महिला आपल्या मुलांसोबत राहतात. या गावात राहणाऱ्या महिलांनीच त्यांच्या मुलांसाठी शाळा आणि कल्चरल सेंटर सुरू केलं आहे. सोबतच पर्यटकांना सामबुरू नॅशनल पार्क फिरवण्याचं त्या कामही करतात. आता वेगवेगळ्या देशातील लोक हे अनोखं गाव बघण्यासाठी येतात. ज्यासाठी पर्यटकांकडून पैसेही घेतले जातात. या पैशातून महिला आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करतात.

आश्चर्याची बाब म्हणजे या गावामध्ये पुरूषांना बंदी असूनही येथील महिला गर्भवती होतात. यामागचं रहस्य हे आहे की, त्या शारीरिक संबंध ठेवण्यासाठी रात्रीच्या अंधारात गावाबाहेर चोरून जातात. आपल्या आवडीच्या पुरूषासोबत त्या संबंध ठेवतात. त्यामुळे महिला गर्भवती होतात. या महिला तोपर्यंत या पुरूषांच्या संपर्कात राहतात जोपर्यंत त्या गर्भवती होत नाहीत.

जशी महिला गर्भवती होते ती त्या पुरूषासोबत सगळे संबंध तोडते. त्यानंतर बाळाचा जन्म होतो. महिला एकटीच बाळाचा सांभाळ करते. ती एकटीच मेहनत करून पैसे कमावते आणि आपलं व आपल्या बाळाचा सांभाळ करते.

महिला आपल्या मुलांना कधीच सांगत नाहीत की, त्यांचे वडील कोण आहेत. उमोजा गावात बाल विवाह, कौटुंबिक हिंसा आणि बलात्कार पीडित महिला राहतात. समबुरूच्या गवताच्या मैदानाच्या मधोमध वसलेल्या या गावात राहणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी इथे शाळाही उघडण्यात आली आहे.
 

Web Title: No man can enter this village ruled only by women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.