Kitchen Tips: कितीही मळलेला असू दे गॅस बर्नर, या टिप्स वापरल्याच दोन मिनिटांत होईल एकदम चकाचक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 11:36 PM2023-03-29T23:36:59+5:302023-03-29T23:37:29+5:30

Kitchen Tips: अनेक जणांच्या किचनमधील गॅस बर्नर जळलेला असतो. तो सहजासहजी स्वच्छ होत नाही. त्यामुळे त्याला हातही लावला जात नाही.

No matter how dirty the gas burner is, just use these tips and it will be sparkling clean in two minutes | Kitchen Tips: कितीही मळलेला असू दे गॅस बर्नर, या टिप्स वापरल्याच दोन मिनिटांत होईल एकदम चकाचक 

Kitchen Tips: कितीही मळलेला असू दे गॅस बर्नर, या टिप्स वापरल्याच दोन मिनिटांत होईल एकदम चकाचक 

googlenewsNext

किचनच्या स्वच्छतेबाबत अनेक जण बऱ्यापैकी खबरदारी घेत असतात. किचनमधील टाइल्स, नळ आदींची स्वच्छता वेळोवेळी करतात. मात्र ज्यावर  जेवण शिजवलं जातं त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. हो आम्ही गॅसच्या बर्नरबाबत बोलत आहोत. अनेक जणांच्या किचनमधील गॅस बर्नर जळलेला असतो. तो सहजासहजी स्वच्छ होत नाही. त्यामुळे त्याला हातही लावला जात नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला जी ट्रिक सांगणार आहोत. त्याचा अवलंब केल्यास गॅसचा बर्नर एकदम चकाचक होईल. तसेच तो पुन्हा कधी मळणारही नाही.  

गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते. त्या तुम्हाला बाहेरून आणाव्या लागणार नाहीत. त्या तुम्हाला तुमच्या किचनमध्ये सहजपणे मिळतील. त्या पुढीलप्रमाणे.

व्हिनेगरचा वापर अनेक जण मॅगी बनवताना करतात. मात्र व्हिनेगर हे स्वच्छतेमध्येही उपयुक्त ठरतं, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. व्हिनेगरमुळे गॅस बर्नर अगदी स्वच्छ होतो. पातेल्यामध्ये अर्था कप व्हिनेगर टाकाा. त्यानंतर त्यात १ मोठा चमचाभर बेकिंग सोडा टाका. त्यानंतर गॅस बर्नर रात्रभर या मिश्रणामध्ये बुडवून ठेवा. त्यानंतर सकाळी टुथ ब्रशच्या मदतीने तो स्वच्छ करा.

ईनोचा वापर करूनसुद्धा तुम्ही गॅस बर्नर स्वच्छ करू शकता. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्या. त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस आणि ईनो टाका. त्यानंतर ईनो हळुहळू टाका आणि हे पातेले १५ मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर बर्नर स्वच्छ झालेला असेल. त्यानंतर बर्नर थोडा अस्वच्छ झाला तरी तुम्ही लिक्विड डिटर्जंटला टुथ ब्रशला लावून तो स्वच्छ करू शकता.  

Web Title: No matter how dirty the gas burner is, just use these tips and it will be sparkling clean in two minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.