आफ्रिकेला जायची गरज नाही, भारतातील या नदीत सोने सापडते; बादल्या कमी पडतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 04:53 PM2023-07-25T16:53:43+5:302023-07-25T16:54:00+5:30
झारखंडमधील स्वर्णरेखा नदी लोकांसाठी कमाईचे साधन बनली आहे. या नदीच्या पाण्यातून सोने मिळते, ते विकून लोक पैसे कमवत आहेत.
भारतात हजारो नद्या आहेत. सोन्यापेक्षाही मौल्यवान पाण्याखालील जीवन आहे. गावाकडून वाहता वाहता शुद्ध असलेल्या या नद्या शहरात प्रदुषित बनून जातात. या नद्यांच्या काठावर, पाण्यावर लाखो लोक जगतात. परंतू, अशी एक नदी भारतात आहे जिच्या पाण्यातून खरोखरचे सोने सापडते. तुम्ही ऑफ्रिका, टांझानियातील सोन्याच्या शोधात असलेल्या लोकांचे व्हिडीओ पाहिले असतील, पण अशी एक रहस्ययमी नदी आहे जिच्यातून सोने काढालयाला लोकांना बादल्या कमी पडतात.
झारखंडमधील स्वर्णरेखा नदी लोकांसाठी कमाईचे साधन बनली आहे. या नदीच्या पाण्यातून सोने मिळते, ते विकून लोक पैसे कमवत आहेत. या नदीत एवढे सोने येते कुठून हा मात्र प्रश्नच बनून राहिला आहे. अनेक वैज्ञानिकांनीदेखील यावर रिसर्च केला आहे, परंतू त्यांनाही याचे यश आलेले नाही.
झारखंडमधील ज्या नदीबद्दल आपण बोलत आहोत, ती नदी स्वर्णरेखा या नावाने ओळखली जाते. पाण्यासोबत नदीत वाहणाऱ्या सोन्यामुळे तिला स्वर्णरेखा म्हणतात. ही नदी रांचीपासून 16 किमी अंतरावर आहे, तिची 474 किमी लांबी आहे.
ही नदी उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागातून वाहते. सोन्याचे कण हे स्वर्णरेखा आणि उपनदी करकरीमध्ये आढळतात. करकरी नदीतूनच सोन्याचे कण वाहून सुवर्णरेखा नदीपात्रात येतात असा लोकांचा समज आहे. या दोन नद्यांमध्ये सोन्याचे कण कोठून येतात हे आजही एक गूढच आहे.
विशेष म्हणजे हे हजारो वर्षांपासून होत आहे. नदी अनेक खडकांमधून वाहते. यावेळी होणाऱ्या घर्षणातून सोन्याचे कण पाण्यात मिसळत असतील असा अंदाज वैज्ञानिकांनी लावला आहे. या नदीतून सोने काढणे कठीण आहे. परंतू, रेतीतून सोन्याचे कण गोळा करावे लागतात. हे कण तांदळाएवढे किंवा त्याहून छोटे असतात. निक आदिवासी सकाळी या नदीवर जातात आणि दिवसभर नदीच्या वाळूमधून सोन्याचे कण गोळा करतात.