31 डिसेंबरच्या पार्टीसाठी बायकोचे ना हरकत प्रमाणपत्र !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 06:27 PM2017-11-24T18:27:28+5:302017-11-24T18:36:44+5:30

31 डिसेंबरची रात्र कुणी आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करतं तर कुणी आपल्या मित्र परिवारासोबत. तर अनेक जण असे असतात की ज्यांना मित्रांसोबत पार्टी तर करायची असते पण बायको आडवी येते ना !

No objection certificate from wife for 31st December party | 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी बायकोचे ना हरकत प्रमाणपत्र !

31 डिसेंबरच्या पार्टीसाठी बायकोचे ना हरकत प्रमाणपत्र !

googlenewsNext

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या जल्लोषपूर्ण स्वागतासाठी जेमतेम महिना बाकी आहे. हॉटेल्स, बार, ढाब्यांची जय्यत तयारी सुरू आहे. याशिवाय ग्रीटींग कार्ड, गिफ्टची दुकाने, जनरल स्टोअर्समध्येही हळूहळू स्वागताच्या वस्तू आलेल्या दिसत आहेत. अलीकडील काही वर्षात नववर्ष स्वागताची तयारी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात केली जातेय. यंदाच्या 31 डिसेंबरवर सर्वात जास्त प्रभाव हा सोशल मीडियाचाच दिसण्याची शक्यता आहे. त्यातही साहजिकपणे आघाडीवर असणार आहे ते म्हणजे व्हॉट्सअॅप. अनेकांचे तर स्पेशल ग्रुप तयार देखील झाले आहेत. नववर्ष स्वागताचं ठिकाण ठरवण्यापासून ते इतर जबाबदा-यांच्या वाटपापर्यंत अगदी सर्व काही इथे ठरवलं जातं.

31 डिसेंबरची रात्र कुणी आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करतं तर कुणी आपल्या मित्र परिवारासोबत. तर अनेक जण असे असतात की ज्यांना मित्रांसोबत पार्टी तर करायची असते पण बायको आडवी येते ना ! मग काय, अशा मंडळींची त्यांचे मित्रमंडळी चांगलीच खिल्ली उडवतात. बायकोने परवानगी दिली नसेल रे असं म्हणून त्याची टिंगल केली जाते, बायकोवरून विविध प्रकारचे मेसेज पाठवून त्याला अगदी नामोहरम करून सोडतात. पण हे सर्व 31 डिसेंबरनंतर...यंदा मात्र 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी चक्क बायकोच्या परवानगीचं ना हरकत प्रमाणपत्रच सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामध्ये बायकोने घातलेल्या अनेक 'जाचक' अटींचा उल्लेख करण्यात आला आहे.  
खालील फोटोत पाहा सोशल मीडियावर व्हायरल झालेले बायकोचे ना हरकत प्रमाणपत्र -

Web Title: No objection certificate from wife for 31st December party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.