'या' देशाच्या हुकूमशहाचा 'उन्माद'; निळ्या रंगाची जिन्स परिधान केली, की देतो भयावह शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 08:21 PM2020-12-29T20:21:10+5:302020-12-29T20:22:14+5:30

जगाच्या वेगवेगळ्या देशांत कपडे परिधान करण्याचीही त्यांची एक संस्कृती आहे. मात्र जगात एक असा देशही आहे. जेथील हुकूमशहाचा उन्माद ऐकूण आपणही हैराण व्हाल.

North Korea dictator kim jong un angry on blue jeans | 'या' देशाच्या हुकूमशहाचा 'उन्माद'; निळ्या रंगाची जिन्स परिधान केली, की देतो भयावह शिक्षा!

'या' देशाच्या हुकूमशहाचा 'उन्माद'; निळ्या रंगाची जिन्स परिधान केली, की देतो भयावह शिक्षा!

Next

आजवर जगात अनेक कृर राजे आणि हुकूमशहा झाले आहेत. त्यांच्या कृरतेचे किस्से आजही ऐकायला मिळतात. जगाच्या वेगवेगळ्या देशांत कपडे परिधान करण्याचीही त्यांची एक संस्कृती आहे. मात्र जगात एक असा देशही आहे. जेथील हुकूमशहाचा उन्माद ऐकूण आपणही हैराण व्हाल. यादेशात लोकांनी निळ्यारंगाची जिन्स परिधान केली तर त्यांना भयावह शिक्षा दिली जाते. या हुकूमशहाचे, असे अनेक किस्से आहेत. 

निळ्या रंगाची जिन्स बॅन - 
या देशाचे नाव आहे, नॉर्थ कोरिया (North Korea) आणि हुकूमशहाचे नाव आहे, किम जोंग उन (Kim Jong  Un). किम जोंग आपल्या देशातील लोकांना निळ्या रंगाची जिन्स परिधान केल्यास भयावह शिक्षा देतो. खरे तर निळ्या रंगाची जिन्स ही जगभरातील लोकांची पहिली पसंत आहे. किम जोंग उनने आपल्या देशात निळ्या रंगाच्या जिन्सवर बंदी घातली आहे.

'हे' आहे कारण -
किम जोंग उन अमेरिकेला आपला शत्रू मानतो. किम जोंग उनचे म्हणणे आहे, की निळ्या रंगाची जिन्स हे अमेरिकन साम्राज्‍यवादाचे प्रतिक आहे. म्हणून त्याने संपूर्ण देशातच निळ्या रंगाची जिन्स परिधान करण्यावर बंदी घातली आहे. जर कुणी चुकीनही या नियमाचे उलंघन केले, तर त्याला सरळ जेलमध्ये टाकले जाते आणि कठोर शिक्षा दिली जाते. 

एवढेच नाही, तर किमने आपल्या देशात इंटरनेट वापरावरही बंदी घातलली आहे. त्यामुळे उत्तर कोरियातील लोकांना बाहेरील जगाची माहितीच मिळत नाही. जगातील लोक कसे राहतात हेही त्यांना समजत नाही. एवढेच नाही, तर या देशात पॉर्न पाहनेही गुन्हा आहे.

जेलमधून कुणीही जिवंत बाहेर येत नाही - 
उत्तर कोरीयात एखाद्याला जेलमध्ये टाकले तर समजावे, की ती व्यक्ती जिवंत बाहेर येणार नाही. येथील कारागृहातील कैद्यांना शस्त्रसज्ज गार्ड अत्यंत यातना देतात. अधिकांश कैद्यांचा तर यातच मृत्यूही होतो. किमचे सैनिक अत्यंत कृर असतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, की हे सैनिक कैद्याच्या हातूनच त्यांची कबर खोदून घेतात. यानंतर मृत्यू झाल्यावर त्याला त्यातच दफनही केले जाते.

Web Title: North Korea dictator kim jong un angry on blue jeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.