हिरो नव्हे हा तर व्हिलन! आधी शेजारणीला वाचवण्यासाठी आगीत घेतली उडी, नंतर आलं सत्य बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 07:25 PM2021-07-14T19:25:10+5:302021-07-14T19:25:53+5:30

घराला लागलेल्या आगीत सिनेमातल्या हिरोप्रमाणे उडी घेत महिलेला वाचवणारा शेजारी सर्वांना रिअल लाईफ हिरोच वाटला, पण नंतर सत्य आलं समोर...

Not a hero, but a villain! First jump into the fire to save the neighborhood, then the truth came out | हिरो नव्हे हा तर व्हिलन! आधी शेजारणीला वाचवण्यासाठी आगीत घेतली उडी, नंतर आलं सत्य बाहेर

हिरो नव्हे हा तर व्हिलन! आधी शेजारणीला वाचवण्यासाठी आगीत घेतली उडी, नंतर आलं सत्य बाहेर

Next

ज्यानं जीव वाचवला तो हिरो नसून खरा व्हिलन असल्याचं समोर आलंय. घटना आहे, उत्तर पूर्ण इंग्लंडमधील. तिथं सुंदेर्लंडमध्ये राहणाऱ्या रॉबर्ट बार्नेट यानं शेजारच्या घराला लागलेल्या आगीतून त्या घरात राहणाऱ्या महिलेला बाहेर काढलं. त्यानंतर बार्नेटचं भरपूर कौतुक झालं. लोकांनी त्याला हिरो घोषित केलं. मात्र, हा बार्नेट हिरो नसून या कथेतील व्हिलन असल्याचं समोर आलं.

शेजारी राहणाऱ्या सेरेना ब्यूरेलच्या घराला आग लावताच बार्नेटनं आगीत उडी घेतली. यादरम्यान तो स्वतःही जखमी झाला. मात्र ही आग स्वत: त्यानेच लावली होती. त्यानं पोलीस तपासात स्वतः आपला गुन्हा कबुल केला. त्यानं म्हटलं, की त्यानंच शेजारी राहणाऱ्या सेरेना ब्यूरेलच्या घरात आग लावली होती. मात्र, त्याला हे माहिती नव्हतं की त्यावेळी सेरेना घरीच आहे.

पोलिस तपासातच ही बाब समोर आली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाहिलं की सेरेनाच्या घराजवळ आग लागण्यापुर्वी कोणीतरी व्यक्ती फिरत होती. पोलिसांनी बार्नेटच्या घराची तपासणी केल्यावर त्यांना त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घालेल्या व्यक्तीने घातलेले तसेच कपडे मिळाले. यावरून पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी बार्नेटला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आधी त्याने काही माहित नसल्याचं सांगितलं नंतर मात्र तो खरं बोलला.

Web Title: Not a hero, but a villain! First jump into the fire to save the neighborhood, then the truth came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.