Good News - ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी अमेझॉन मॅसेंजर लाँच करणार असल्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 05:45 PM2017-07-23T17:45:33+5:302017-08-21T17:19:44+5:30

नवी दिल्ली, दि. 23 - ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी असणार्‍या अमेझॉनने मॅसेंजर लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Now come Amazon's AnimeMessenger | Good News - ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी अमेझॉन मॅसेंजर लाँच करणार असल्याची माहिती

Good News - ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी अमेझॉन मॅसेंजर लाँच करणार असल्याची माहिती

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी असणार्‍या अमेझॉनने मॅसेंजर लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते एनीटाईम या नावाने मॅसेंजर सादर करणार आहे. एनीटाईमची काही युजर्सच्या माध्यमातून चाचणीदेखील सुरू आहे. एवढेच नव्हे तर अमेझॉनने आपल्या ग्राहकांकडून आदर्श मॅसेंजरमध्ये नेमके कोणते फिचर्स असावेत? याबाबत सूचनादेखील मागविल्या आहेत. यासाठी एक अत्यंत व्यापक असा सर्व्हेदेखील सुरू झाला आहे.
अमेझॉनच्या मॅसेंजरमध्ये सर्व अत्यावश्यक फिचर्स असतील. अर्थात यात वैयक्तीक चॅटींग आणि सामुदायीक ग्रुप्समध्ये संदेश/प्रतिमा/व्हिडीओ आदींची देवाण-घेवाण करता येईल. तसेच यासोबत इमोजी, जीआयएफ आणि स्टीकर्स शेअरिंगचे पर्यायदेखील राहतील. हे मॅसेंजर अँड्रॉइड, आयओएस आणि वेब या तिन्ही प्लॅटफॉर्मवर काम करेल. व्हिडीओ आणि प्रतिमांना सुशोभित करण्यासाठी यात अत्यंत आकर्षक असे फिल्टर्स देण्यात येतील. तर यावरून उच्च दर्जाचे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलही करण्यात येतील. याशिवाय यात लोकेशन शेअरिंग, गेमींग, बिझनेस चॅट, कस्टमाईज्ड चॅटींग आदी विशेष फिचर्सदेखील असतील असे यात नमूद करण्यात आले आहे. एंड-टू-एंड एनक्रिप्शनचे कवच लाभलेल्या या मॅसेंजरमध्ये मोबाईल क्रमांकाने नव्हे तर अमेझॉनच्या अकाऊंटने लॉगीन करण्याची सुुविधा असण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये अमेझॉनचे एनीटाईम हे मॅसेंजर लाँच करण्यात येईल अशी शक्यता आहे.

Web Title: Now come Amazon's AnimeMessenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.