आता फेसबुक रोखणार दहशतवाद
By admin | Published: June 17, 2017 12:29 AM2017-06-17T00:29:14+5:302017-06-17T00:29:14+5:30
जगातील सगळ्यात मोठे सोशल मेडिया नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुकने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद रोखण्याचा निर्धार केला आहे.
- अनिल भापकर। लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जगातील सगळ्यात मोठे सोशल मेडिया नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुकने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद रोखण्याचा निर्धार केला आहे. फेसबुकवर लोकांच्या भावना भडकावणाऱ्या पोस्ट अपलोड करण्याचा प्रयत्न केल्यास अशा पोस्ट लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच फेसबुककडून डिलीट करण्यात येणार आहेत.
भावना भडकाविणारे व्हिडिओ किंवा फोटो आढळल्यास आटीर्फेशिअल इंटेलिजन्स या तंत्राचा वापर करून ते डिलीट केले जातील. यासाठी फेसबुकने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह पोस्टबद्दल लोकांनी माहिती दिल्यानंतर ती डिलीट केली जात असे. आता मात्र आर्टीफिशल इंटेलिजन्स या तंत्राद्वारे अपलोड होणारा फोटो किंवा व्हीडिओ दहशवादी संघटनेशी संबधित तर नाही ना हे तपासले जाणार आहे.