असं आईस्क्रीम तयार करण्यात आलं आहे, जे फ्रीजमधून बाहेर काढलं तरी तीन तास वितळत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 01:59 PM2017-08-08T13:59:58+5:302017-08-21T16:48:33+5:30

आता एक असं आईस्क्रीम तयार करण्यात आलं आहे, जे फ्रीजमधून बाहेर काढलं तरी तीन तास वितळत नाही.

Now the ice cream will not stir | असं आईस्क्रीम तयार करण्यात आलं आहे, जे फ्रीजमधून बाहेर काढलं तरी तीन तास वितळत नाही

असं आईस्क्रीम तयार करण्यात आलं आहे, जे फ्रीजमधून बाहेर काढलं तरी तीन तास वितळत नाही

Next
ठळक मुद्देआता एक असं आईस्क्रीम तयार करण्यात आलं आहे, जे फ्रीजमधून बाहेर काढलं तरी तीन तास वितळत नाही.जपानमधील शास्त्रज्ञांनी एका असा उपाय शोधला आहे ज्यामुळे आईस्क्रीम लगेच वितळणार नाही. जपानमधील कनाजवा विद्यापीठाच्या रिसर्चने आईस्क्रीम वितळविण्याची क्षमता कमी करण्याचा पर्याय शोधला असल्याचा दावा केला आहे.

टोकीयो, दि. 8- आईस्क्रीम हा सगळ्याच्याच आवडीचा पदार्थ आहे. सगळेच जण आवडीने या पदार्थाचा आस्वाद घेतात. पण हे आईस्क्रीम फ्रिजमधून बाहेर काढलं किंवा ते खाण्यासाठी वाटीमध्ये काढलं तर लगेचच वितळायला लागतं. आईस्क्रीम लगेच वितळत म्हणून ते भरभर खावं लागतं. पण आता एक असं आईस्क्रीम तयार करण्यात आलं आहे, जे फ्रीजमधून बाहेर काढलं तरी तीन तास वितळत नाही.

जपानमधील शास्त्रज्ञांनी एका असा उपाय शोधला आहे ज्यामुळे आईस्क्रीम लगेच वितळणार नाही. जपानमधील कनाजवा विद्यापीठाच्या रिसर्चने आईस्क्रीम वितळविण्याची क्षमता कमी करण्याचा पर्याय शोधला असल्याचा दावा केला आहे. या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेलं आईस्क्रीम खोलीतील सामान्य तापमानातही विरघळत नाही. द टाइम्समने हे वृत्त दिलं आहे. जपानच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या त्या प्रोडक्टची चाचपणी करण्यासाठी त्यांनी हेअर ड्रायरचा वापर केला. हेअर ड्रायरद्वारे त्यांनी गरम हवा त्यांनी तयार केलेल्या प्रोडक्टसह आईस्क्रीमवर सोडली. गरम हवेचाही त्या आईस्क्रीमवर काहीही परिणाम झाला नाही. मूळ आकारातच ती आईस्क्रीम राहिल्याचं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. शास्त्रज्ञांनी स्ट्रॉबेरीतून काढलेल्या पॉलिफॅनॉल द्रवासह इंजेक्शनद्वारे आइस्क्रीम तयार केलं आहे. पाणी आणि तेल वेगळं होऊ न देणं हा पॉलिफॅनिक द्रवाचा गुणधर्म आहे, असं कनाजवा विद्यापिठाचे  प्राध्यापक तोमिहिसा ओता यांनी सांगितलं आहे.

ज्या आईस्क्रीममध्ये हा पदार्थ असेल ते आईस्क्रीन दिर्घ काळापर्यंत त्याच्या मूळ स्वरूपात राहतं, असंही ते म्हणाले आहेत.
जपानी शास्त्रज्ञ स्ट्रॉबेरीतून निघणाऱ्या पॉलिफॅनॉलवर प्रयोग करत असताना हा शोध लागला आहे. जपानच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेलं हे आईस्क्रीम एका खोलीतील साधारण तापमानात ठेवलं होतं पण त्या तापमानाचा आईस्क्रीमवर काहीही परिणाम झाला नाही. तीन तास ते तसंच होतं. या संदर्भातील एक व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. 

Web Title: Now the ice cream will not stir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.