आता 100 आणि 1000 रूपयांमध्ये अनलिमीटेड पाणीपुरी

By admin | Published: May 22, 2017 03:48 PM2017-05-22T15:48:58+5:302017-05-22T15:52:38+5:30

जर एखाद्या ठिकाणी किंवा कॅम्पेनमध्ये फ्री आणि अनलिमीडेट हे असे दोन शब्द जर लिहीले असतील तर ती विशिष्ट गोष्ट सगळ्यांना आवडणार हे तर निश्चित असतं

Now unlimited water puri in 100 and 1000 rupees | आता 100 आणि 1000 रूपयांमध्ये अनलिमीटेड पाणीपुरी

आता 100 आणि 1000 रूपयांमध्ये अनलिमीटेड पाणीपुरी

Next
>लोकमत ऑनलाईन
मुंबई. ता. 22- जर एखाद्या ठिकाणी किंवा कॅम्पेनमध्ये फ्री आणि अनलिमीडेट हे असे दोन शब्द जर लिहीले असतील तर ती विशिष्ट गोष्ट सगळ्यांना आवडणार हे तर निश्चित असतं. मग ते सीम कार्ड कंपन्यांनी दिलेली अनलीनिटेड कॉलिंगची ऑफर असूदे किंवा एका ठराविक किंमतीमध्ये मिळणारे अनलिमीडेट पदार्थ असूदेत, सर्वसामान्य लोक त्याला उत्तम प्रतिसाद देणार हे तर निश्चितच असतं. रिलायन्स जीओच्या अशाच फ्री ऑफरकडे आपण सगळेच आकर्षित झालो आहेत.  
पण सध्या जीओ सीमकार्ड प्रमाणेच एक "जीओ पाणीपुरीवाला" सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  गुजरातच्या  पोरबंदरमधले पाणीपुरी विक्रेते रवि जगदंबा जीओच्या ऑफर्समुळे चांगलेच प्रभावित झाले आहेत. त्यांच्या पाणीपुरी स्टॉलवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी चांगलीच शक्कल वढवली आहे. जीओसारखीच स्वस्त आणि मस्त ऑफर त्यांनी पाणीपुरी प्रेमींसाठी सुरू केली आहे. 
रवि यांनी दैनिक तसचं मासिक अशा दोन ऑफर्स तयार केल्या आहेत. त्यानुसार दैनिक ऑफरमध्ये तुम्ही 100 रूपयामध्ये दिवसाला अनलिमीटेड पाणीपुरी खाऊ शकतात. तर दुसरी ऑफर आहे 1000 रूपयाची.  या एक हजार रूपयात तुम्ही महिनाभर अनलिमीटेड पाणीपुरी खाऊ शकता.  पोरबंदरमधल्या प्रत्येक व्यक्तीला ही ऑफर लागू आहे. या खास ऑफरमुळे रवि पाणीपुरीवाला संपूर्ण पोरबंदरमध्ये प्रसिद्ध झाला आहे. "पाणीपुरीचा खप वाढावा यासाठी, जिओ सारखी ऑफर सुरू करत असल्याचं रवि जगदंबा यांनी सांगितले आहे.
पाणीपुरी हा पदार्थ खरंतर संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. सगळेच अगदी आवडीने पाणीपुरी खायचा आनंद घेत असतात. म्हणुनच आपल्या स्टॉलवर ग्राहकांची वर्दळ वाढावी, यासाठी पोरबंदरच्या पाणीपुरी विक्रेत्याने ही खास ऑफर सुरू केली आहे.  

Web Title: Now unlimited water puri in 100 and 1000 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.