विचित्र! महिलेच्या पोटात सापडलं लाटणं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2017 08:52 AM2017-01-01T08:52:55+5:302017-01-01T08:52:55+5:30
अनेक आश्चर्यांनी भरलेल्या या जगात वेळोवेळी अनेक चित्रविचित्र गोष्टी समोर येत असतात. अशीच एक विचित्र घटना उत्तराखंडमध्ये समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - अनेक आश्चर्यांनी भरलेल्या या जगात वेळोवेळी अनेक चित्रविचित्र गोष्टी समोर येत असतात. अशीच एक विचित्र घटना उत्तराखंडमध्ये समोर आली आहे. येथील एका महिलेच्या पोटात चक्क एक फूट लांब लाटणं आढळलं आहे. राज्यातील हल्दानी मेडिकल काँलेजमध्ये डॉक्टरांनी एक जटिल शस्त्रक्रिया करून हे लाटण महिलेच्या पोटातून बाहेर काढलं आहे.
नैनितालमधील हल्दानी येथील सुशीला तिवारी वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टरांनी संबंधित महिलेची ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. डॉक्टरांनी सांगितले की या महिलेला पोटात दुखत असल्याने तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये या महिलेच्या आतड्यात गॅस असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र शस्रक्रिया करण्यात आल्यावर महिलेच्या पोटात लाटणं आढळले." यासंदर्भातील वृत्त न्यूज 24 च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.
या महिलेच्या पोटात लाटणं आढळल्याने डॉक्टरांना धक्का बसला. दरम्यान, महिलेच्या पोटात लाडणं आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रकाराबाबत डॉक्टरांनी लैंगिक अत्याचाराची शक्यता व्यक्त केली असून, घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे.