2.5 लाख रुपये किलो किमतीच्या आंब्याची चोरी; सोशल मीडियावर फोटो टाकणे अंगलट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 06:19 PM2023-06-20T18:19:08+5:302023-06-20T18:41:24+5:30

ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यात 2.5 लाख रुपये प्रति किलो भाव असलेल्या आंब्याची चोरी झाली आहे.

odisha-mangoes-worth-rs-2-5-lakh-kg-stolen-from-odisha-mans-farm | 2.5 लाख रुपये किलो किमतीच्या आंब्याची चोरी; सोशल मीडियावर फोटो टाकणे अंगलट

2.5 लाख रुपये किलो किमतीच्या आंब्याची चोरी; सोशल मीडियावर फोटो टाकणे अंगलट

googlenewsNext


नुआपाडा: ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या बागेतून काही आंबे चोरीला गेले. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासनही आंब्याच्या चोरीचा तपास करत आहे. आंबे चोरीला गेल्याने इतका गोंधळ का उडाला? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. हा आंबा साधासुधा नसून, जपानमध्ये आढळणारा खास आंबा आहे. 

या आंब्याचे पीक जपानमध्ये घेतले जाते. विशेष म्हणजे, जपानच्या या खास आंब्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 2.5 लाख रुपये प्रति किलो किंमत आहे. ओडिशातील लक्ष्मीनारायण नावाच्या व्यक्तीने आपल्या शेतात हा विशेष आंबा पिकवला आहे. चोरीच्या एक दिवस आधी त्याने आपल्या बागेतील आंब्याचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड केले होते.

लक्ष्मीनारायण यांनी त्यांच्या बागेत 38 जातींचे आंबे लावल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यां आंब्याची किंमत खूप जास्त आहे. त्यांनी सोशल मीडियावर आंब्याचे फोटो शेअर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या बागेत चोरी जाली. चोरीच्या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे कृषी उत्पादनांच्या सुरक्षिततेबाबत आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाबाबत चिंता निर्माण झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

Web Title: odisha-mangoes-worth-rs-2-5-lakh-kg-stolen-from-odisha-mans-farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.