'या' हॉस्पिटलमध्ये 36 नर्स 'प्रेग्नेंट'; म्हणाल्या, 'येथील पाणी पिऊ नका, नाहीतर...' 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 05:25 PM2019-08-01T17:25:16+5:302019-08-01T17:39:47+5:30

मर्सी कॅनसेस सिटी हॉस्पिटल हे अमेरिकेतील एक नावाजलेले चिल्ड्रन हॉस्पिटल आहे.

Oh, baby! 36 nurses in Kansas City hospital NICU due to give birth this year | 'या' हॉस्पिटलमध्ये 36 नर्स 'प्रेग्नेंट'; म्हणाल्या, 'येथील पाणी पिऊ नका, नाहीतर...' 

'या' हॉस्पिटलमध्ये 36 नर्स 'प्रेग्नेंट'; म्हणाल्या, 'येथील पाणी पिऊ नका, नाहीतर...' 

Next

अमेरिकेतील एका हॉस्पिटलमध्ये आश्चर्यचकित करणारी घटना समाेर आली आहे. येथील एका चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये एका वर्षात 36 नर्स गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. मिसूरी येथील चिल्ड्रन मर्सी कॅनसेस सिटी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. 

मर्सी कॅनसेस सिटी हॉस्पिटल हे अमेरिकेतील एक नावाजलेले चिल्ड्रन हॉस्पिटल आहे. याठिकाणी इंटेसिव्ह केअर युनिटच्या (NICU) 36 नर्स एका वर्षात गर्भवती झाल्या. आतापर्यंत 20 नर्सची प्रसूती झाली आहे. तर, बाकीच्या नर्सची या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रसूती होण्याची शक्यता आहे.

या हॉस्पिटलने आपल्या फेसबुक पेजवर या नर्सचा ग्रुप फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, 'आमच्या इंटेसिव्ह केअर नर्सरीच्या नर्सनी याठिकाणी आलेल्या मुलांसाठी रात्र-दिवस घालवली. त्यावेळी त्या स्वत: गर्भवती होत्या. ICN च्या या कुटुंबाला शुभेच्छा!'  

'गुड मॉर्निंग अमेरिका'ने दिलेल्या अहवालानुसार, या हॉस्पिटलमधील एक नर्स एलिसन रोन्कोने एक मजेशीर वाक्य शेअर केले आहे. त्या म्हणाल्या की, 'ज्यावेळी तुम्हाला गर्भवती व्हायचे आहे, त्यावेळी येथील पाणी प्या!, असे सांगून हॉस्पिटलमधील रुग्ण मजा घेतात.'

एलिसन रोन्कोने 7 जानेवारी, 2019 रोजी एका मुलाला जन्म दिला होता. दरम्यान, या नर्सनी सांगितले की, आम्ही एकमेकींची काळजी घेतो. आम्हाला लहान मुलं आवडतात म्हणून मुलांची सुद्धा जास्त काळजी घेतो.
 

Web Title: Oh, baby! 36 nurses in Kansas City hospital NICU due to give birth this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.