अरे बापरे! विचित्र आजारामुळे 180 डिग्रीमध्ये वळते या मुलीची मान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 08:04 PM2017-10-29T20:04:38+5:302017-10-29T20:06:08+5:30
अनेक आश्चर्यांनी आणि गुढ रहस्यांनी भरलेल्या या जगामध्ये दररोज अनेक चित्रविचित्र आजार समोर येत असतात. असे आजार झालेल्या व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असाच एक प्रकार...
कराची - अनेक आश्चर्यांनी आणि गुढ रहस्यांनी भरलेल्या या जगामध्ये दररोज अनेक चित्रविचित्र आजार समोर येत असतात. असे आजार झालेल्या व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असाच एक प्रकार पाकिस्तानमध्ये समोर आला आहे. येथील कराचीमध्ये राहणाऱ्या अफसीन क्युमबर हिला एक विचित्र आजार झाला आहे. या आजारामुळे नऊ वर्षांची अफसीन ही आपल्या शरीराचे संतुलन राखू शकत नाही. त्यामुळे तिची मान 180 डिग्रीमध्ये वळते.
डेली मेलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार मस्क्युलर डिसऑर्डर या मांसपेशींशी संबंधित आजाराने अफशीन त्रस्त आहे. त्यामुळे अफशीन आपली मान सरळ ठेवू शकत नाही. तसेच तिला धड उभे राहता किंवा चालताही येत नाही. एवढेच नाही तर तिला जेवण्यासाठी आणि टॉयलेटमध्ये जाण्यासाठीही तिला इतरांची मदत घ्यावी लागते.
तिच्या अशा विचित्र अवस्थेमुळे मुले तिच्याजवळ जाण्यासा घाबरतात. ती शाळेत जाऊ शकत नाही. अफशीन हिला सहा भाऊ बहिणी आहेत आणि तेच तिचे मित्र आहेत. अफशीन हिचे आईवजील सांगतात की, त्यांनी आपल्या मुलीला अनेक स्थानिक डॉक्टरांकडे उपचारांसाठी नेले होते. मात्र या विचित्र आजाराचा इलाज नसल्याचे या डॉक्टरांनी सांगितले.
अफशीनची आई जमलीन सांगते की, अफशीनचा जन्म हा अन्य मुलांप्रमाणेच सर्वसामान्यरित्या झाला होता. तसेच सुरुवातीचे काही महिने ती अन्य सर्वसामान्य मुलांप्रमाणेच होती. मात्र आठव्या महिन्यानंतर तिचे आयुष्य बदलले. एकदा खेळताना ती पडली आणि तिच्या मानेला दुखापत झाली. त्यावेळी घरच्यांनी तिच्या दुखापतीकडे लक्ष दिले नाही. तसेच थोडाफार इलाज करून घेतला. मात्र अफशीन जशी मोठी होत गेली, तसा तिचा आजार वाढत गेला.
अफशीनवर उपचार करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळए लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करावे लागते, असे अफशीनचे वडील अल्लाह जुरियो यांनी सांगितले.