अबब! तब्बल २२०० किलोचं मेडल, 'या' शाळेने केला वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 08:12 PM2021-07-02T20:12:17+5:302021-07-02T21:37:18+5:30

काही जागतिक रेकॉर्ड असे असतात जे सकारात्मकता देऊन जातात. असाच एक रेकॉर्ड एका शाळेने केलाय.  त्यांनी तब्बल २२०० किलोचं पेंडंट बनवलंय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात वजनदार पेंडंट म्हणून ते नोंदवलं गेलंय.

Ohh! 2200 kg medal, 'this' school set a world record | अबब! तब्बल २२०० किलोचं मेडल, 'या' शाळेने केला वर्ल्ड रेकॉर्ड

अबब! तब्बल २२०० किलोचं मेडल, 'या' शाळेने केला वर्ल्ड रेकॉर्ड

Next

काही जागतिक रेकॉर्ड असे असतात जे सकारात्मकता देऊन जातात. असाच एक रेकॉर्ड एका शाळेने केलाय.  त्यांनी तब्बल २२०० किलोचं पेंडंट बनवलंय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात वजनदार पेंडंट म्हणून ते नोंदवलं गेलंय.
शाळा हे असे स्थळ आहे जिथे क्रिडास्पर्धा, परिक्षा वेगवेगळे उपक्रम यातून अनेक कर्तबगार व्यक्तीमत्व बहरतात. या व्यक्तिमत्वांचा बालवयात सन्मान करण्यासाठी त्यांना मेडल देऊन गौरवण्यात येते. या मेडल मधील पेंडंटला प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या जीवनात कमालीचे महत्वाचे स्थान असते. इंटरनॅशनल इंडियन स्कुल- अबु धाबी यांनी एक असं मेडल तयार केलंय जे ६३ स्केवर फुट हुन जास्त लांब गोलाकार आणि जवळपास २२०० किलो वजनाइतके आहे. या शाळेचं पाचवं वर्ष आणि संयुक्त अरब अमिरती याच्या ५०व्या वर्षपूर्ती निमित्त त्यांनी हे मेडल बनवलं. हे पदक शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून डिझाईन केलं आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिरतीचा ध्वज आणि अबु धाबीतील लोकप्रिय ठिकाणांची प्रतिके आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या पंचांच्या समितीद्वारे या पदकाचे परिक्षण करण्यात आले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आले.
युपीआय डॉट कॉमच्या अनुसार, इंटरनॅशनल इंडियन स्कुल- अबु धाबीने गेल्या पाच वर्षात उत्कृष्टरित्या यश प्राप्त केले आहे. पुढील वर्षातही आमचे विद्यालय असेच यश, गौरव व अनेक उच्च गोष्टी मिळवत राहिल. हे पदक आम्हाला त्यासाठी सतत प्रेरणा देत राहील.

Web Title: Ohh! 2200 kg medal, 'this' school set a world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.