न उम्र की सीमा हो...; 90 वर्षांच्या 'आजोबां'नी 92 वर्षांच्या 'गर्लफ्रेंड'सोबत केलं लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 11:35 AM2022-03-27T11:35:53+5:302022-03-27T11:37:22+5:30
हे ओल्डएज कपल Mo अँड Jo नावाने ओळखले जाते. गेल्या आठवड्यात हे दोघेही ब्रिटन येथील सॉमरसेट येथील घरी गेले आणि नंतर दोघांनीही चर्चमध्ये जाऊन लग्न केले.
90 वर्षांचे 'आजोबा' मॉरिस बेंटन यांनी 92 वर्षांच्या 'आजी' जोने ऑरिस यांना गेल्या वर्षी प्रपोज केले होते आणि आता दोघांनीही लग्न केले आहे. विशेष म्हणजे लग्न करण्यापूर्वी हे दोघेही 37 वर्षं एकमेकांसोबत होते.
डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, हे ओल्डएज कपल Mo अँड Jo नावाने ओळखले जाते. गेल्या आठवड्यात हे दोघेही ब्रिटन येथील सॉमरसेट येथील घरी गेले आणि नंतर दोघांनीही चर्चमध्ये जाऊन लग्न केले. येथे एक समारंभही झाला. जोने ऑरिस यांना गेल्या वर्षी 3 मार्चला हार्ट अॅटॅकही आला होता. याच दरम्यान बेंटन यांनी त्यांना प्रपोजदेखील केले होते. आता दोघेही पती-पत्नी बंधनात अजकले आहेत.
2 मुलांची आई, 6 जणांची आजी अन् दोघांची पणजी -
जोने ऑरिस यांना दोन मुले आहेत. त्या 6 मुलांच्या आजी आहेत. एवढेच नाही, तर त्या 2 मुलांच्या पणजीही आहेत. त्या म्हणतात, 'गेली अनेक वर्षं बेंटनचे प्रपोजल नाकारत होते. पण जेव्हा मला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा मला वाटले की, आता माझ्याकडे फार दिवस नाहीत. यामुळे आम्ही लग्न करायला हवे. जेव्हा मी 'हो' म्हटले, तेव्हा मॉरिस बेंटनला धक्काच बसला, असे वाटत होते, की त्यालाही हृदयविकाराचा झटका आला आहे, तेव्हापासून आम्ही आनंदात आहोत आणि एकत्र आहोत.'
आधीही झाले आहे लग्न -
पहिल्या लग्नानंतर जोने ओरिसचा घटस्फोटात झाला होता. यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांचा दुसरा पती वयाच्या ५० व्या वर्षी मरण पावला. जोने ओरिस म्हणाल्या, 'आम्ही दोघांनी शनिवारी लग्न केले, पण आमच्या नातलगांना आणि मित्रांना वाटत होते, की आमचे आधीच लग्न झालेले आहे.'