कपलच्या किचनमध्ये अचानक सापडी 300 वर्ष जुनी सोन्याची नाणी, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 10:48 AM2022-11-19T10:48:41+5:302022-11-19T10:49:00+5:30

Gold Coin From Kichen Of Couple: मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेच्या नॉर्थ यॉर्कशायरमध्ये एका कपलच्या घरात काम चालू होतं. इथे किचनच्या आत थोडं खोदकाम करण्यात येत होतं आणि तिथेच ही नाणी आढळून आली.

Old gold coin from kitchen of couple worth of crores in north yorkshire in America | कपलच्या किचनमध्ये अचानक सापडी 300 वर्ष जुनी सोन्याची नाणी, जाणून घ्या किंमत

कपलच्या किचनमध्ये अचानक सापडी 300 वर्ष जुनी सोन्याची नाणी, जाणून घ्या किंमत

Next

Gold Coin From Kichen Of Couple: घर किंवा शेतांमध्ये खोदकाम करताना अनेकदा मूल्यवान रत्न मिळतात. ज्यांना ते सापडतात ते रोतारात मालामाल होऊन जातात. अनेक काही मूल्यवान वस्तू अशा ठिकाणी सापडतात ज्यांबाबत कधी कुणी विचारली केलेला नसतो. अशीच एक घटना काही दिवसांआधी अमेरिकेतून समोर आली आहे. इथे एका कपलच्या किचनमध्ये जुनी सोन्याची नाणी सापडली आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेच्या नॉर्थ यॉर्कशायरमध्ये एका कपलच्या घरात काम चालू होतं. इथे किचनच्या आत थोडं खोदकाम करण्यात येत होतं आणि तिथेच ही नाणी आढळून आली. असं सांगितलं गेलं की, ही नाणी एका कपमध्ये भरण्यात आली होती आणि किचनच्या फरशीच्या 5 इंच खाली होते. मजूरांना जशी ही नाणी दिसली त्यांनी कपलला बोलवलं.

जेव्हा कपलने ही नाणी पाहिली तर तेही हैराण झाले. आधी तर वाटलं की, कपलनेच ही नाणी लपवून ठेवली असेल, पण तसं नव्हतं. हे साधारण 300 वर्ष जुनी नाणी आहेत. कपलला सुद्धा आधी हे वाटलं की, जमिनीखाली एखादा विजेचा तार असेल. पण जेव्हा कप व्यवस्थित पाहिला तर 1610 ते 1727 दरम्यानची ही नाणी होती. ही नाणी सापडल्यावर कपलने लगेच लंडनमधील एका ऑक्शन कंपनीला फोन केला.

किती आहे यांची किंमत

कपलने जेव्हा त्यांना ही पूर्ण घटना सांगितली तेव्हा कंपनीवालेही अवाक् झाले. कंपनीचे लोक कपलच्या घरी आले. त्यांनी सांगितलं की, नाणी साधारण 300 वर्ष जुनी आहेत. रिपोर्ट्सनुसार, कपलने नुकतीच ही नाणी एका लिलावात 7 कोटी रूपयांना विकली आहेत. 

Web Title: Old gold coin from kitchen of couple worth of crores in north yorkshire in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.