खोदकाम करताना सापडला 1300 वर्ष जुना नेकलेस, सोनं आणि रत्नांनी केला आहे तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 10:06 AM2022-12-08T10:06:20+5:302022-12-08T10:08:41+5:30

Old Necklace Found In England: वैज्ञानिकांनी यावर आयुष्यात एकदाच मिळणारा हार असं लेबल लावलं आहे. हा हार ब्रिटनमध्ये आतापर्यंत सापडलेल्या महागड्या वस्तूंपैकी एक असल्याचं म्हटलं आहे.

Old necklace of 1300 years found in excavation studded with gold precious stones cant guess the price | खोदकाम करताना सापडला 1300 वर्ष जुना नेकलेस, सोनं आणि रत्नांनी केला आहे तयार

खोदकाम करताना सापडला 1300 वर्ष जुना नेकलेस, सोनं आणि रत्नांनी केला आहे तयार

googlenewsNext

Old Necklace Found In England: जगभरातून नेहमीच अशा घटना ऐकायला मिळतात की, खोदकाम करताना शेकडो किंवा हजारो वर्ष जुन्या वस्तू सापडल्या. इंग्लंडमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एक 1,300 वर्ष जुना नेकलेस सापडला आहे. सेंट्रल इंग्लंडमध्ये एका बांधकामाचं खोदकाम करताना एंग्लो सॅक्सन स्मशानभूमीतील एका कबरेत सोनं आणि मौल्यवान रत्नापासून तयार 1,300 वर्ष जुना हार सापडला आहे. लंडन पुरातत्व विभागानुसार, हा हार 630-670 ईस्वी सन पूर्वचा आहे.

वैज्ञानिकांनी यावर आयुष्यात एकदाच मिळणारा हार असं लेबल लावलं आहे. हा हार ब्रिटनमध्ये आतापर्यंत सापडलेल्या महागड्या वस्तूंपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. या हारामध्ये रोमन नाणी, सोनं, गार्नेट, काच आणि काही रत्ने आहेत. एकूण यात 30 पेंडेंट आहेत. हा हार नॉर्थम्प्टनच्या जवळ शोधण्यात आला आहे. या हाराची खास बाब म्हणजे हा आयाताकार आहे. जो रेड गार्नेट आणि सोबतच सोन्याचा बनला आहे. हा हार एका स्मशानभूमीत सापडला आहे.

तसेच एका कबरेतून दोन डिझायनर भांडी आणि एक तांब्याचं भांड सापडलं आहे. लंडनच्या पुरातत्व संग्रहालयाचे सुपरवायजर म्हणाले की, जेव्हा सोन्याची पहिली झलक मातीतून वर दिसली तेव्हा समजलं होतं की, काहीतरी महत्वाचं असणार आहे. पण हे नव्हतं माहीत की, हे इतकं खास असेल. 
ते म्हणाले की, अजूनही काही खोदकाम केलं जात आहे. इथे आम्हाला चांदीने तयार करण्यात आलेले मानवी चेहऱ्यांचे काही असामान्य चित्रही सापडले. येथील क्रॉसचा विशाल आकार याकडे इशारा करतो की, दफन करण्यात आलेली महिला एक ख्रिश्चन नेता असावी.

Web Title: Old necklace of 1300 years found in excavation studded with gold precious stones cant guess the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.