Old Passbook: पप्पांच्या ट्रंकमध्ये ६० वर्षांपूर्वीचे पासबुक सापडले; बॅलन्स पाहतो तर... उडाला ना भाऊ...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 11:50 AM2022-08-17T11:50:41+5:302022-08-17T11:51:58+5:30
हिनोजोसा यांच्या वडिलांनी ती रक्कम क्रेडिट यूनियन बँकेत ठेवण्यात आली होती. आता ही बँक बंद पडली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर हिनोजोसाने ते पासबुक एका ट्रँकात जुन्या कागदपत्रांसोबत ठेवून दिले होते.
आजकाल आपण जुनी रद्दी, वडिलांच्या-आजोबांच्या काळातील कागदपत्रे फेकून देतो. त्यात मोठा खजाना सापडल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. यामुळे एक व्यक्ती करोडपती झाला आहे. त्याला त्याच्या वडिलांच्या ६० वर्षे जुन्या पासबुकने श्रीमंत बनविले आहे.
जर तुम्ही बँकेत काही असतील आणि तुम्हाला 60 वर्षांनंतर आठवले की काही पैसे बँकेत पडून आहेत, ज्याची सरकारने हमी दिली आहे, तर. अमेरिकेतील चिलीमध्ये हा प्रकार घडला आहे. एक्सेल हिनोजोसाचे वडील 1960 आणि 70 च्या दशकात घर घेण्यासाठी पैसे जमा करत होते. त्यांनी तेव्हा $163 डॉलर जमविले होते. भारतीय चलनात रूपांतरित केल्यास त्याचे 12684 रुपये होतात.
हिनोजोसा यांच्या वडिलांनी ती रक्कम क्रेडिट यूनियन बँकेत ठेवण्यात आली होती. आता ही बँक बंद पडली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर हिनोजोसाने ते पासबुक एका ट्रँकात जुन्या कागदपत्रांसोबत ठेवून दिले होते. एके दिवशी काहीतरी शोधत असताना हिनोजोसाने त्या ट्रंकमध्ये पासबुक पाहिले. ते उघडले असता त्यात काही रक्कम जमा दिसली. ती रक्कम पाहून त्यांनी काय कामाची, असा विचार केला. परंतू ते बंद करत असताना त्यावर स्टेट गॅरंटी असा शब्द पाहिला गणित घालण्यास सुरुवात केली.
साठ वर्षांपूर्वीचे पैसे आता महागाईच्या काळात किती पटींनी वाढले असतील? ही रक्कम १.२ दशलक्ष डॉलर्स एवढी झाली असेल असा अंदाज लावला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर हिनोजोसाला त्याच्या वडिलांचे पासबुक सादर करण्यास सांगितले गेले. यामध्ये ही रक्कम राज्याने हमी दिलेल्या त्यात येते असे सिद्ध झाले. भारतीय रुपयात ही रक्कम 9.33 कोटी रुपये होते. यानंतर हिनोजोसाने राज्य सरकारकडे ही रक्कम मिळण्याबाबत दावा केला. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली, तिथेही हिनोजोसाच्या बाजुनेच निकाल आला. बँक पासबुकचे भविष्य आता अंतिम न्यायालय ठरवेल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. अशाप्रकारे हिनोजोसाला १० कोटी रुपये मिळणार आहेत.