बाबो! 'खाज' महागात पडली; ७ इंचाची बाटली पार्श्वभागात अडकली...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 11:43 AM2019-12-24T11:43:27+5:302019-12-24T11:47:57+5:30
खाज माणसाला काय काय करायला लावेल याचा काही नेम नाही, याचंच हे एक उदाहरण म्हणता येईल.
'खाज' माणसाला काय काय करायला लावेल याचा काही नेम नाही. अनेकदा आपण बघतो की, काही लोक खाजवण्यासाठी नखांचा, काही लोक कंगव्याचा तर काही लोक जे हातात मिळेल त्याचा वापर करतात. पण चीनमधील एका ६० वर्षीय व्यक्तीला पार्श्वभाग खाजवण्यासाठी बॉटलचा वापर करणं चांगलंच महागात पडलंय.
गॉंगडॉन्ग प्रांतातील डॉंगन शहरातील ही घटना असून वेन नावाच्या व्यक्तीच्या पार्श्वभागातून डॉक्टरांनी ७ इंचाची काचेची बॉटल काढली आहे. वेन याने डॉक्टरांना सांगितले की, तो या बॉटलचा वापर पार्श्वभाग खाजवण्यासाठी करत होता. अचानक काही इंच बॉटल त्याच्या पार्श्वभागात अडकली.
याच स्थितीत वेन हा हॉस्पिटल ऑफ वेस्टर्न अॅन्ड ट्रेडिशनल चायनिज मेडिसिनमध्ये पोहोचला आणि त्याने झालेल्या प्रकाराबाबत डॉक्टरांना सांगितले. जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा त्याला नीट चालताही येत नव्हते. कारण त्याच्या पार्श्वभागात साधारण २ इंच बॉटल शिरली होती.
डॉक्टरांनी आधी त्याच्या एक्स-रे काढला आणि त्यांना जे दिसलं ते पाहून हैराण झाले. कारण बॉटलचा बराच भाग आत शिरला होता. डॉक्टर Lin Jun यांनी जराही वेळ न घालवता वेळीच सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी बॉटल पार्श्वभागातून बाहेर काढली. वेनला त्याच दिवशी हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले.