नशीबवान! दोन दिवसांआधीच जन्मली अन् कोट्याधीश बनली मुलगी, पण कशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 03:37 PM2023-06-29T15:37:44+5:302023-06-29T15:44:20+5:30
Interesting News : या मुलीचा जन्म झाला आणि दोन दिवसातच ती आलिशान बंगला, लक्झरी कार आणि नोकर-चाकरांची मालक झाली.
Interesting News : व्यक्ती आयुष्यात लाखो रूपये कमावण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. त्यानंतरही काहींचं श्रीमंत होण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही तर काहींना इतकं काही मिळतं ज्याची त्यांची कल्पनाही केली नसेल. काही लोक तर लॉटरीच्या माध्यमातून काही सेकंदात कोट्याधीश होतात. पण एक लहान मुलगी जन्माच्या दोन दिवसांतच कोट्याधीश बनली. ती कशी ते जाणून घेऊ...
मुलीचा जन्म झाला आणि दोन दिवसातच ती आलिशान बंगला, लक्झरी कार आणि नोकर-चाकरांची मालक झाली. हे सगळं तिला मिळालं तिच्या श्रीमंत आजोबाकडून. आजोबाने 50 कोटी रूपयांपेक्षा अधिक किंमत असलेला एक ट्रस्ट फंड आपल्या नातीला गिफ्ट केला.
डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणारे बॅरी ड्रिविट-बार्लो यांच्या मुलीने नुकताच एका मुलीला जन्म दिला. बॅरीने नातीच्या जन्मानंतर इन्स्टावर एक फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. सोबतच नातीला गिफ्ट म्हणून कोट्यावधी रूपयांची हवेली आणि ट्रस्ट फंडही गिफ्ट केला.
बेरीने 10 कोटी रूपये किंमतीची आलिशान हवेली आणि साधारण 52 कोटी रूपयांचा एक ट्रस्ट फंड आपल्या नातीच्या नावे केला. त्याने इन्स्टावर मुलगी आणि नातीचा फोटो शेअर करत लिहिले की, आज माझी 23 वर्षीय मुलगी सैफ्रन ड्रिविट-बार्लोने एका मुलीला जन्म दिला. आम्ही खूप आनंदी आहोत.
बॅरीने सांगितलं की, गेल्या आठवड्यातच त्यांनी एक हवेली खरेदी केली होती. ते या हवेली इंटेरिअर नातीच्या हिशेबाने डिझाइन करतील. कारण ही हवेली आता त्यांच्या नातीची झाली आहे.
कोण आहे बॅरी?
इन्स्टावरील माहितीनुसार बॅरी एक Artist आहे. एका रिपोर्टनुसार, ते 1600 कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. बॅरी आपल्या परिवाराला कोट्यावधी रूपयांचे गिफ्ट देण्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. गेल्यावर्षी त्यांनी 4 मिलियन पाउंड खर्च केले होते.
बॅरी समलैंगिक आहे. 1999 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून त्यांच्या घरी जुळी मुलं झाली होती. त्यानंतर 2019 मध्ये बॅरी आपल्या पार्टनरपासून वेगळे झाले. आता त्यांच्या मुलीने एका मुलीला जन्म दिला. नातीच्या येण्याच्या आनंदात त्यांनी कोट्यावधी रूपयांची संपत्ती आपल्या नातीच्या नावे केली.