मनासारखं बाळ मिळावं म्हणून महिलेने केली Sperm Donor Party, लवकरच पूर्ण होणार तिचं स्वप्न...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 01:43 PM2021-07-19T13:43:24+5:302021-07-19T13:45:16+5:30

'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, ३३ वर्षीय सिंगल महिला लोला जिमेनेजने हव्या तशा बाळाला जन्म देण्यासाठी 'पिन द स्पर्म ऑन द यूटेरस' आणि आयव्हीएफ बिंगो फॉर बॅशचं आयोजन केलं होतं.

OMG! Britain woman organise sperm donor party to find perfect baby daddy | मनासारखं बाळ मिळावं म्हणून महिलेने केली Sperm Donor Party, लवकरच पूर्ण होणार तिचं स्वप्न...

मनासारखं बाळ मिळावं म्हणून महिलेने केली Sperm Donor Party, लवकरच पूर्ण होणार तिचं स्वप्न...

Next

लंडनमधील (London) एका महिलेने आई होण्यासाठी जे केलं तसं काही तुम्ही ना ऐकलं असेल ना पाहिलं असेल. महिलेने आई होण्यासाठी स्पर्म डोनर पार्टी (Sperm Donor Party) आयोजित केली. जेणेकरून आपल्याला हवं तसं बाळ मिळण्यासाठी कुणीतरी स्पर्म डोनर मिळावा. एकटी राहणाऱ्या या महिलेचा शोधही पूर्ण झाला आहे आणि ती लवकरच एका बाळाला जन्मही देणार आहे. 

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये आपल्या डोनरची निवड करणारी लोला (Lola Jimenez)  लवकरच आई होणार आहे. सप्टेंबरमध्ये तिची डिलेव्हरी होऊ शकते. डॉक्टरांनी लोलाला असं करण्यास मनाई केली होती. पण तिने कुणाचं काही ऐकलं नाही.

'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, ३३ वर्षीय सिंगल महिला लोला जिमेनेजने हव्या तशा बाळाला जन्म देण्यासाठी 'पिन द स्पर्म ऑन द यूटेरस' आणि आयव्हीएफ बिंगो फॉर बॅशचं आयोजन केलं होतं. (हे पण वाचा : सासूसाठी सूनबाई शोधतेय बॉयफ्रेन्ड, दोन दिवसांसाठी 'त्या' व्यक्तीला मिळतील ७२ हजार रूपये!)

कायद्याचं शिक्षण घेणारी लोला जिमेनेजने पार्टीत आलेल्या पाहुण्यांना भुरके केस आणि निळ्या डोळ्यांच्या पुरूषांच्या अमेरिकन बॅंक डेटाबेसमधून आपला आवडता डोनर निवडण्यास सांगितलं. याआधी लोला बरेच वर्ष एका रिलेशनशिपमध्ये होती. ती नोव्हेंबर २०१९ मध्ये पुन्हा सिंगल झाली. त्यानंतर तिन सिंगल राहण्याचाच निर्णय घेतला. पण तिला आई व्हायं होतं. त्यामुळे तिने हा अनोखा आणि अजब उपाय शोधला. (हे पण वाचा : महिला बाथरूममध्ये करत होती 'हे' विचित्र काम, कोर्टाने सार्वजनिक टॉयलेटचा वापर करण्यावर घातली बंदी)

साउथ वेस्ट लंडनची राहणारी लोला म्हणाली की, 'जेव्हा मी लहान होते तेव्हापासून माझ्या जीवनां अंतिम लक्ष्य लग्न करणं आणि एक परिवार बनवणं हेच होतं. पण तसं काही शक्य होऊ शकलं नाही'. ती पुढे म्हणाली की, 'मी नेहमीच हे म्हणत होते की, जर मी ३५ वयात सिंगल असती तर मी सोलो मॉम बनले असते. आता मी ते स्वीकारलं. कारण दुसऱ्या कुणाचा शोध घेणं वेळ घालवण्यासारखं आहे'.

लोला म्हणाली की, 'पाहुण्यांना मी भुरके केस आणि निळ्या डोळ्यांच्या डोनरची निवड करण्यास सांगितलं. कारण माझी इच्छा होती की, माझं बाळ माझ्यासारखं दिसावं. आपल्या या निर्णयासाठी लोलाला टिकेचाही सामना करावा लागला. पण तरी तिने तेच केलं जे तिला योग्य वाटलं. लोलाचे मित्र-मैत्रिणी तिच्या या निर्णयाने खूश आहेत.
 

Web Title: OMG! Britain woman organise sperm donor party to find perfect baby daddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.