डॉक्टरांनी रूग्णाच्या पोटातून काढला स्टीलचा मोठा ग्लास, आत कसा गेला वाचाल तर चक्रावून जाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 11:29 AM2022-08-06T11:29:48+5:302022-08-06T11:30:50+5:30
Steel Glass in Stomach: या केसबाबत डॉक्टर लाल बहादूर सिद्धार्थ यांनी सांगितलं की, आमच्याकडे एक रूग्ण हर्नियाच्या ऑपरेशनसाठी आला होता आणि म्हणाला की, त्याच्या पोटात दुखत आहे. माझं ऑपरेशन करा.
Steel Glass in Stomach: तशा तर पोटातून टॉवेल, कात्री, नाणी, लोखंडी वस्तू किंवा ग्लव्स काढण्यात आल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण पोटातून स्टीलचा ग्लास काढल्याची घटना तुम्ही ऐकली नसेल. उत्तर प्रदेशमध्ये जौनपूरच्या भटौली गावात रहाणाऱ्या 50 वर्षीय समरनाथसोबत ही घटना घडली आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्याच्या पोटातून स्टीलचा ग्लास काढला आहे.
समरनाथच्या पोटात तीन-चार दिवसांपासून फार वेदना होत होत्या. अनेक हॉस्पिटलमध्ये त्याने उपचार घेतले, पण त्याला आराम मिळाला नाही. त्यानंतर तो वाजिदपूरमधील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लाल बहादूर सिद्धार्थ यांना भेटले आणि समस्या सांगितली. त्यानंतर एक्स-रे काढल्यावर डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि त्यांच्या पोटातून स्टीलचा ग्लास बाहेर काढला. जेव्हा रूग्णाचा जीव वाचला.
या केसबाबत डॉक्टर लाल बहादूर सिद्धार्थ यांनी सांगितलं की, आमच्याकडे एक रूग्ण हर्नियाच्या ऑपरेशनसाठी आला होता आणि म्हणाला की, त्याच्या पोटात दुखत आहे. माझं ऑपरेशन करा. मी आधी एक्स-रे काढला आणि दिसलं की, पोटात एक स्टीलचा फुल साइज ग्लास आहे. मी रूग्णाला विचारलं की पोटात ग्लास कसा गेला तेव्हा रूग्ण काही सांगू शकला नाही. तो म्हणाला की, त्याच्या पोटात अनेक दिवसांपासून वेदना होत आहेत. नंतर डॉक्टरांच्या टीमने मोठ्या प्रयत्नांनंतर त्याच्या पोटातून ग्लास बाहेर काढला.
पोटात ग्लास गेला कसा?
दरम्यान स्टीलचा ग्लास काढल्यानंतर ही घटना चर्चेचा विषय ठरली की, अखेर पोटात ग्लास गेला कसा. डॉक्टरांनी सांगितलं की, दारू पिण्याच्या नादात कुणाचंतरी रूग्णासोबत भांडण झालं होतं. त्या लोकांनी कथितपणे रूग्णाच्या प्रायव्हेट पार्टमधून ग्लास आत टाकला. पण लोकांना यावर विश्वास बसत नाहीये.
रूग्णाने केला दावा
समरनाथने सांगितलं की, गावातील काही लोकांसोबत त्याचा वाद झाला होता. लोकांनी दारू पिऊन माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये ग्लास टाकला. जेव्हा मी शुद्धीवर आला तेव्हा पोटात दुखत होतं. 5 दिवस पोटात दुखत राहिलं आणि माझं खाणं पिणंही बंद झालं. त्यानंतर तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी एक्स-रे काढला तेव्हा समजलं की, पोटात एक स्टीलचा फुल साइज ग्लास आहे. आला रूग्णाला भलेही आराम मिळत असेल, पण लोकांचा या घटनेवर विश्वास बसत नाहीये.