डॉक्टरांनी रूग्णाच्या फुप्फुसातून काढलं 4 सेमी लांब झुरळ, पण आत गेलंच कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 01:16 PM2024-02-29T13:16:39+5:302024-02-29T13:17:09+5:30

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मेडिकल प्रोसेस 22 फेब्रुवारीला कोच्चिच्या अमृता हॉस्पिटलमध्ये झाली. 55 वर्षीय व्यक्तीला श्वास घेण्यास समस्या होत होती.

OMG! Doctor removes 4 cm long cockroach from patient lung | डॉक्टरांनी रूग्णाच्या फुप्फुसातून काढलं 4 सेमी लांब झुरळ, पण आत गेलंच कसं?

डॉक्टरांनी रूग्णाच्या फुप्फुसातून काढलं 4 सेमी लांब झुरळ, पण आत गेलंच कसं?

Kerala Cockroach In Lungs: केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामान्यपणे झुरळं घरातील कानाकोपऱ्यांमध्ये फिरताना दिसतात. पण केरळच्या एका व्यक्तीच्या फुप्फुसांमध्ये झुरळ फिरताना दिसलं. डॉक्टरांनी एका रूग्णाच्या फुप्फुसांमधून 4 सेंटीमीटर लांब एक झुरळ काढलं. रूग्णाला श्वास घेण्यास समस्या होत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मेडिकल प्रोसेस 22 फेब्रुवारीला कोच्चिच्या अमृता हॉस्पिटलमध्ये झाली. 55 वर्षीय व्यक्तीला श्वास घेण्यास समस्या होत होती. ज्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला. टेस्ट केल्यावर डॉक्टरांना त्याच्या फुप्फुसांमध्ये एक झुरळ आढळलं.

डॉक्टर टिंकू जोसेफ यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या टीमने रूग्णाचं ऑपरेशन केलं आणि झुरळ बाहेर काढलं. रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं की, झुरळ आतंच सडू लागलं होतं, ज्यामुळे रूग्णाची श्वास घेण्याची समस्या वाढली होती. रूग्णाच्या शरीरातून झुरळ काढण्यासाठी डॉक्टरांना 8 तासांचा वेळ लागला. रूग्णाला आधीच श्वास घेण्याची समस्या होती. ज्यामुळे ऑपरेशन फार अवघड झालं. मीडिया रिपोर्टनुसार, झुरळ रूग्णाच्या घशाच्या मागच्या भागात रूग्णाच्या आधीच्या उपचारासाठी लावण्यात आलेल्या नळीमध्ये पोहोचला होता. डॉक्टर जोसेफ यांनी सांगितलं रूग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. त्याला घरी पाठवण्यात आलं आहे.
आधीही झाल्या अशा घटना

दरम्यान, अशीच एक घटना दिल्लीच्या एका हॉस्पिटलमधून समोर आली होती. इथे डॉक्टरांच्या टीमने 26 वर्षीय एका तरूणाच्या पोटातून 38 नाणी आणि 37 चुंबक काढले होते. या तरूणाला 20 दिवसांपासून पोटदुखी आणि उलटीची समस्या होत होती. ऑपरेशन श्री गंगा राम हॉस्पिटलमध्ये झालं. रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने शरीरात झिंक वाढवण्यासाठी नाणी आणि चुंबक गिळले होते. कारण त्याला वाटत होतं की, याने त्याला बॉडीबिल्डींगमध्ये मदत मिळेल. 

Web Title: OMG! Doctor removes 4 cm long cockroach from patient lung

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.