जबरदस्त! तब्बल १५० वर्षांनी दिसलं सर्वात मोठं दुर्मीळ घुबड, साइज बघून हैराण झाले लोक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 11:54 AM2021-10-26T11:54:47+5:302021-10-26T11:56:40+5:30
जेव्हा पहिल्यांदा त्यांनी हे घुबड पाहिलं तर त्यांना वाटलं की, हा एखादा मोठा गरूड असेल. त्यानंतर तो झाडाच्या खालच्या फांदीवर बसला आणि त्यांनी त्याला दूरबिनीने पाहिलं.
आज मनुष्याला वाटतं की, त्यांनी सगळं काही पाहिलं. पण तरीही असे काही जीव आहेत जे अनेक वर्षांपासून बघायलाच मिळाले नाहीत. ते आहेत पण मनुष्यांच्या नजरेपासून दूर आहेत. असंच एक घुबड १५० वर्षांनंतर पहिल्यांदा दिसलं. हे घुबड आफ्रिकेच्या रेन फॉरेस्टमध्ये आढळणारं सर्वात मोठं घुबड आहे. ज्याचा फोटो ब्रिटनच्या एका वैज्ञानिकाने टिपला.
घुबडाच्या या प्रजातीला Shelley Eagle म्हटलं जातं. वैज्ञानिकाने हा फोटो १६ ऑक्टोबरला काढला होता. घुबडाची ही प्रजाती फार दुर्मीळ आहे. Dr. Joseph Tobias जे इंपेरिअल कॉलेज, लंडनमध्ये लाइफ सायन्स विभारात कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचे सहकारी डॉ. रॉबर्ट विलियिमसोबत मिळून हे फोटो कॅप्चर केले.
हे घुबड त्यांना केवळ १५ सेकंदासाठीच दिसलं होतं. त्याचे डोळे पूर्णपणे काळे होते आणि त्याचा आकारही मोठा होता. डॉ.जोसेफ म्हणाले की, जेव्हा पहिल्यांदा त्यांनी हे घुबड पाहिलं तर त्यांना वाटलं की, हा एखादा मोठा गरूड असेल. त्यानंतर तो झाडाच्या खालच्या फांदीवर बसला आणि त्यांनी त्याला दूरबिनीने पाहिलं. तेव्हा त्यांना लक्षात आलं हे तेच घुबड आहे जे अनेक वर्षापासून दिसलंच नाही.
First confirmed sighting of an extremely rare owl in Ghana's Atewa Forest in 150 years. Two British ecologists conducting research in the forest recently saw the Shelley's Eagle Owl (indigenous to Central & West Africa). The discovery could prompt the Atewa Forest to be protected pic.twitter.com/fQ6ININAuH
— ghanaspora (@ghanaspora) October 23, 2021
Dr. Nathaniel Annorbah म्हणाले की, हा एक खळबळजनक शोध आहे. अनेक टिम या पक्ष्याबाबत अनेक वर्षापासून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या घुबडाबाबत सर्वातआधी १८७२ मध्ये Richard Bowdler Sharpe ने उल्लेख केला होता. सध्या या गोष्टीची काळजी घेतली जात आहे की, ज्या ठिकाणी हे घुबड बघण्यात आलं तिथे शिकाऱ्यांची नजर पडू नये.