OMG! पुढील शतकात १८० वर्ष जगणार मनुष्य; वैज्ञानिकाने केला हैराण करणारा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 03:13 PM2022-01-10T15:13:03+5:302022-01-10T15:13:29+5:30
पुढील शतकात म्हणजे २१०० पासून मनुष्याचं वय १८० वर्ष होऊ शकतं. त्याचसोबत या शतकाच्या अखेरीस मनुष्याचे वय १३० वयापर्यंत राहू शकतं
सध्याच्या युगात माणसांच्या जगण्याचं आयुष्य खूप कमी होतानाचं चित्र दिसत आहे. एक काळ होता ज्यात लोकं १०० पेक्षा जास्त जगत होती. परंतु आता मनुष्याचं वय ६० ते ६५ वर्षापर्यंत मर्यादित झालं आहे. माणसांचं जगण्याचं वय वाढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वैज्ञानिक जीवापाड मेहनत घेत आहेत. त्याचवेळी एका वैज्ञानिकाने केलेल्या दाव्याने सगळेच हैराण झाले आहेत.
वैज्ञानिकाचा दावा आहे की, पुढील शतकात म्हणजे २१०० पासून मनुष्याचं वय १८० वर्ष होऊ शकतं. त्याचसोबत या शतकाच्या अखेरीस मनुष्याचे वय १३० वयापर्यंत राहू शकतं. म्हणजे मनुष्य १३० वर्ष जगू शकतो. आजच्या काळात मनुष्य ७०-८० वयापर्यंत जगू शकतो. अशावेळी त्यांच्या अनेक इच्छा मनात कायम राहतात. परंतु जर मनुष्याचं वय १८० वर्ष झालं तर त्याच्या अर्धवट राहिलेल्या इच्छाही पूर्ण होऊ शकतील. कॅनाडाचे HEC Montreal चे प्रोफेसर लियो बेल्जिल यांनी दावा केलाय की, सर्वात वृद्ध व्यक्तीच्या जगण्याचा रेकॉर्ड २१०० व्या शतकात मोडला जाईल. सध्या सर्वात जास्त जगणाऱ्या फ्रान्समधील महिलेचा जागतिक रेकॉर्ड आहे. १९९९ मध्ये त्या वयाच्या १२२ व्या वर्षी मृत्यूमुखी पावल्या.
लियो बेल्जिल म्हणाल्या की मानवी जीवनाची सर्वोच्च मर्यादा नसते हे काही डेटानुसार कळतं. परंतु मानवी आयुष्य वाढल्यास मेडिकल सर्विसेजशी जास्तीत जास्त गरज भासेल. त्यामुळे खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. अधिक वय असल्याने वृद्धांना अधिक आरोग्य सुविधा लागतील. त्यांना पेन्शन अथवा सरकारी स्कीमवर निर्भर राहावं लागेल. जास्त वय झाल्यास मनुष्य काहीही काम करण्यास सक्षम नसेल जेणेकरुन तो इतरांवर निर्भर राहील. मीडिया रिपोर्टनुसार, मनुष्य अधिक काळ जिवंत राहिल्यास त्याच्या शरीराचे काही भाग काम करणं बंद होईल. अशावेळी निरोगी राहण्यासाठी त्यांना आरोग्य सुविधेची गरज भासेल आणि मेडिकल बिलही वाढेल. लियो बेल्जिल यांनी केलेल्या या दाव्यामुळे सगळेच हैराण आहेत. मनुष्य १८० वर्ष जगला तर त्याला अनेक व्याधींचा सामना करावा लागू शकतो असंही सांगण्यात येत आहे.