भारतातील 'ही' ट्रेन सायकलपेक्षा धावते स्लो; ताशी 10 KM स्पीड!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 09:11 AM2023-01-16T09:11:25+5:302023-01-16T09:12:33+5:30
ही ट्रेन ताशी 10 किलोमीटरपेक्षा कमी वेगाने चालवली जात आहे. ही तामिळनाडूमधील उटीच्या सुंदर मैदानी पर्वत आणि घनदाट जंगलांमध्ये धावते.
निलगिरी : सध्या आधुनिक आणि हायस्पीड ट्रेन रुळांवर आणून जगातील विकसित देशांच्या रेल्वेसोबत स्पर्धा करण्यासाठी भारतीय रेल्वे तयार आहे. देशात एक्स्प्रेस ट्रेन, मेट्रो आणि आता वंदे भारत ट्रेन हायस्पीडसह लोकांसाठी लाइफलाइन ठरत आहे. तर एक ट्रेन आहे, जी सायकलच्या वेगापेक्षा स्लो धावते.
ही ट्रेन ताशी 10 किलोमीटरपेक्षा कमी वेगाने चालवली जात आहे. ही तामिळनाडूमधील उटीच्या सुंदर मैदानी पर्वत आणि घनदाट जंगलांमध्ये धावते. ही ट्रेन पर्यटकांच्या खास पसंतीपैकी एक आहे. तामिळनाडूतील उटीच्या पर्वत आणि घनदाट जंगलातून जाणारी ही ट्रेन देशातील सर्वात कमी वेगाची ट्रेन आहे. या ट्रेनचे नाव मेट्टुपालयम ऊटी निलगिरी पॅसेंजर ट्रेन आहे.
या ट्रेनचा वेग ताशी 10 किलोमीटरपेक्षा कमी आहे. ही एक टॉय ट्रेन आहे, जी तुम्हाला पर्यटनावेळी खूप मजा देते. ती वाफेच्या इंजिनद्वारे चालवली जात आहे. दरम्यान, अतिशय संथ गतीने ही ट्रेन चालत असल्याने पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्याची पूर्ण संधी मिळते. मेट्टुपलायम उटी निलगिरी पॅसेंजर ट्रेन 46 किलोमीटरचे अंतर पर्वत आणि घनदाट जंगलांमध्ये कापून पर्यटकांना नैसर्गिक आनंद देते. या प्रवासात 5 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
ट्रेनचा वेग इतका कमी आहे की, पर्यटक चालत्या ट्रेनमधून जंगलात उतरून पुन्हा ते चढू शकतात. तसेच, ही ट्रेन 46 किलोमीटरच्या प्रवासात अनेक ठिकाणी सुद्धा थांबते. दम्यान, निलगिरी माउंटन रेल्वे इंग्रजांनी आणली असे म्हणतात. ब्रिटीशांच्या काळात ब्रिटिश लोक या ट्रेनमध्ये बसून उटी आणि त्याच्या सभोवतालच्या सुंदर खोऱ्यांचा आनंद लुटत असत. आजही त्याच काळातील वाफेच्या इंजिनद्वारे चालणारी ही ट्रेन लोकांना सुंदर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी उपयोगी पडत आहे.