फारच खास आहे हा कुत्रा, जगात सर्वात जास्त लांब आहेत त्याचे कान; वाचा लांबी...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 06:23 PM2021-09-27T18:23:13+5:302021-09-27T18:27:05+5:30
मीडिया रिपोर्टनुसार, या कुत्र्याचं नाव आहे लू. लू चं वय तीन वर्षे आहे. तो मूळचा अमेरिकेतल्या ओरेगॉनचा आहे.
जगभरात अनेक अजब गोष्टी आहेत. इथे तुम्हाला कधी काय ऐकायला, वाचायला किंवा बघायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा तर अशा गोष्टी समोर येतात ज्याबाबत वाचल्यावर हैराण व्हायला होतं. एक अशीच घटना अमेरिकेतून समोर आली आहे. इथे कुत्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा कुत्रा काही सामान्य कुत्रा नाही तर या कुत्र्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या कुत्र्याचं नाव आहे लू. लू चं वय तीन वर्षे आहे. तो मूळचा अमेरिकेतल्या ओरेगॉनचा आहे. लू च्या कानाची लांबी पृथ्वीवर जिवंत असलेल्या सर्व कुत्र्यांच्या कानांपेक्षा जास्त आङे. ज्यामुळेच त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. रेकॉर्डनुसार, लू च्या कानाची लांबी १३.३८ इंच आहे. लू सद्या त्याचा मित्र पेग आल्सेनसोबत राहत आहे. पेग म्हणाला की, त्याला हे माहीत होतं की, लू चे कान लांब आहेत. पण कधी त्यांची लांबी मोजली नव्हती. त्याला अंदाजही नव्हता की, तो वर्ल्ड रेकॉर्ड बनवेल.
ऑल्सेनने सांगितलं की, पहिल्यांदा जेव्हा मी लू ला पाहिला तेव्हा त्याला घरी नेण्याचा विचार केला होता. ती त्याच्या कानाकडे नेहमीच लक्ष देत होती. पण कोरोना काळात जेव्हा तिने लूच्या कानाची लांबी मोजली तर ती हैराण झाली होती. तिच्या कानांची लांबी ३४ सेंटीमीर म्हणजे १३.३८ इंच होती. त्यामुळे लू त्याच्या कानांमुळे चर्चेत आहे. जे त्याला भेटतात त्याच्या कानाला हात लावतात. आता लू सेलिब्रिट झाला आहे.