बॉसने कानात काही सांगितलं तर कळतचं नव्हतं, समोर आलं असं कारण वाचून बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 11:29 AM2024-03-13T11:29:10+5:302024-03-13T11:44:27+5:30
इथे राहणारी 26 वर्षीय तरूणी पर्सनल सेक्रेटरीची नोकरी करत होती. नेहमीच तिचा बॉस तिच्या कानात हळुवार काहीना काही बोलत राहत होता.
आपली जगण्याची पद्धत दिवसेंदिवस बदलत चालली आहे. जेव्हापासून टेक्नॉलॉजीने आपल्या जीवनात जागा मिळवली आहे. तेव्हापासून अनेक फायदे तर झालेच सोबतच अनेक समस्याही समोर येत आहेत. या समस्यांचा गंभीरतेने विचार करणं गरजेचं झालं आहे. यांकडे दुर्लक्ष केलं तर महागात पडू शकतं. असंच काहीसं एका तरूणीसोबत झालं.
ही घटना चीनमधील आहे. इथे राहणारी 26 वर्षीय तरूणी पर्सनल सेक्रेटरीची नोकरी करत होती. नेहमीच तिचा बॉस तिच्या कानात हळुवार काहीना काही बोलत राहत होता. समस्या ही होती की, या तरूणीला त्याचं बोलणं काही समजत नव्हतं. याचं जे कारण समोर आलं, ते तुम्हाला माहीत असायला हवं.
चीनच्या शॅडोंगमध्ये राहणारी ही तरूणी एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. तिचं काम पर्सनल सेक्रेटरीचं होतं. अशात तिचा सुपरवायजर तिच्या कानात काहीना काही फुसफुसत असे. जेव्हा हे तरूणीला समजलं नाही तर तो संतापला. अशात ती आपले कान चेक करण्यासाठी डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिचे कान चेक केले तर समजलं की, तिच्या डाव्या कानातील न्यूरोलॉजिकल हियरिंग डॅमेज झालं आहे. म्हणजे ती बहिरी झाली आहे. याच कारणाने तिला बॉसचं काही समजत नव्हतं
हेडफोन्सने झाली ही समस्या
डॉक्टरांनी सांगितलं की, तिची ऐकण्याची क्षमता नष्ट होण्यामागे जास्त वेळ मोठ्या आवाजात हेडफोन्सने म्युझिक ऐकणं ही आहे. ती रोज झोपण्याआधी दोन तास म्युझिक ऐकत होती. कॉलेजपासूनच तिला ही सवय लागली होती. डॉक्टरांनी सांगितलं की, जरी आवाज जास्त नसेल तरी सतत हेडफोन्स लावून म्युझिक ऐकल्याने बहिरेपणा येऊ शकतो. तरूणीसोबत तेच झालं आणि आता तिला एका कानात मशीन बसवावी लागणार आहे.