एका नवरीसाठी दोघांनी आणली वरात; तिनं हार घातला एकाच्या गळ्यात अन् दुसऱ्याला म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 02:56 PM2021-06-05T14:56:29+5:302021-06-05T14:56:36+5:30
एका नवरीच्या मंडपात दोन नवरदेव वरात घेऊन पोहोचले. पहिल्या नवरदेवाने नवरीला हार घातला तर दुसऱ्या नवरदेवासोबत नवरीचं लग्न लावून देण्यात आलं.
उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. एका लग्नात एक नवरी आणि दोन नवरदेव अशी स्थिती निर्माण झाली होती. इथे एका नवरदेवासोबत हार घालण्याचा रिवाज झाला तर दुसऱ्या नवरदेवासोबत नवरीची पाठवणी करण्यात आली. यावर पहिल्या नवरदेवाच्या कुटुंबीयांना गोंधळ घातला. त्यांनी यावरून थेट पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी नवरी आणि तिच्या वडिलांना व काकांना ताब्यात घेतलं आहे.
ही घटना एटा जिल्ह्यातील सिरांव गावातील आहे. इथे एका नवरीच्या मंडपात दोन नवरदेव वरात घेऊन पोहोचले. पहिल्या नवरदेवाने नवरीला हार घातला तर दुसऱ्या नवरदेवासोबत नवरीचं लग्न लावून देण्यात आलं. या प्रकारावरून पहिल्या नवरदेवाकडील लोकांना नवरी आणि तिच्या घरातील लोकांविरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी नवरीच्या वडिलांना आणि दुसऱ्या नवरदेवाच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं. (हे पण वाचा : नववधूला शेजारीण म्हणाली काळी अन् दोन कुटुंबात फ्री स्टाईलच झाली; बायकांची दे दणादण हाणामारी)
पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तर दुसरीकडे सिरांव गावात हे प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे. पहिले पोहोचलेल्या नवरदेवाला नवरीने हार घातला तर दुसरा नवरदेव नवरीला घेऊन गेला. आता इतका विचित्र प्रकार घडल्यावर लग्नात गोंधळ झाला नसता तर नवल. तेच नवरीची पाठवणी न केल्याने नाराज झालेल्या पहिल्या नवरदेवाने थेट पोलिसांना बोलवत तक्रार केली. मात्र, पोलीस अधिकारी यावर काहीही बोलण्यास तयार नाही. (हे पण वाचा : दुसऱ्या मुलीसोबत लग्न होता सैनिक प्रियकर, 'बॅंड-बाजा-बारात' घेऊन त्याच्या घरी पोहोचली प्रेयसी!)
गावात सगळीकडे या घटनेची चर्चा रंगली आहे. जो तो या लग्नाबाबतच चर्चा करत आङे. अनेक लोकांनी सांगितले की, लग्न झालेल्या नवरीचं वयही कमी आहे. तर काही लोक म्हणाले की, लग्नाच्या नावावर हा फसवणुकीचा प्रकार आहे.