तुमच्याकडे आहे का ही नोट? या १ रुपयाच्या नोटेची किंमत १० लाख! जाणून घ्या नेमका प्रकार काय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 11:41 AM2022-11-19T11:41:09+5:302022-11-19T11:43:24+5:30

आपल्याकडे सध्या चलनात जास्त रक्कमेची नोट २ हजार रुपयांची आहे. पण, तुम्ही कधी १० लाख रुपयांची नोट पाहिली आहे का? तुम्ही ती नोट पाहिली नसेल तर आज आम्ही तुम्हाला ती नोट दाखवणार आहे.

one rupee note equal to 10 lakh valuable rare currency | तुमच्याकडे आहे का ही नोट? या १ रुपयाच्या नोटेची किंमत १० लाख! जाणून घ्या नेमका प्रकार काय

तुमच्याकडे आहे का ही नोट? या १ रुपयाच्या नोटेची किंमत १० लाख! जाणून घ्या नेमका प्रकार काय

googlenewsNext

आपल्याकडे सध्या चलनात जास्त रक्कमेची नोट २ हजार रुपयांची आहे. पण, तुम्ही कधी १० लाख रुपयांची नोट पाहिली आहे का? तुम्ही ती नोट पाहिली नसेल तर आज आम्ही तुम्हाला ती नोट दाखवणार आहे,पूर्वी देशात ब्रिटीश काळात १ रुपयांच्या नोटेला लाखो रुपयांची किंमत होती. ब्रिटीशकालीन अनेक नोटा आणि नाणी आहेत, ज्यांची किंमत लाखात आहे. उत्तर प्रदेशमधील गोमतीनगर येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध संशोधन संस्थेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय चलन परिषदेच्या या 104 व्या वार्षिक परिषदेत अशी चलने ठेवण्यात आली आहेत.

आजच्या घडीला तुम्हाला अनेकजण जुन्या नोटांचे शौकीन दिसतील. अनेकांना जुन्या नोटा गोळा करुन जपून ठेवण्याचा छंद आहे. तर अनेकांना जुन्या नोटा आणि नाणी पाहण्याची आणि ठेवण्याची इच्छा आजही कायम आहे. उत्तर प्रदेशमध्ये जुन्या नोटांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.तिथे देशाच्या विविध राज्यातून आलेल्या लोकांनी अनेक स्टॉल्स लावले आहेत. या प्रदर्शनात ब्रिटीशकालीन, हज नोट, अरबी समुद्राच्या आसपासच्या देशांचे जुने चलन, ज्यांची किंमत लाखो आहे.

गुजरात इलेक्शन ड्युटी लागली, IAS अधिकाऱ्याने कारसोबत पोझ दिली, निवडणूक आयोगाने घेतली दखल

या प्रदर्शनात अशोक कुमार यांच्या स्टॉलवर ब्रिटिशकालीन एक रुपयाची नोट आहे, ज्याची किंमत दहा लाख रुपये आहे. ब्रिटिशकालीन ५० रुपयांच्या नोटेची किंमत आठ लाख रुपये आहे. दुसरीकडे, हज यात्रेकरूंसाठी १० रुपयांची नोट ६ लाख रुपयांची आहे आणि अरबी समुद्राच्या आसपासच्या देशांसाठी १, ५ आणि १० रुपयांच्या केशरी नोटांची किंमत प्रत्येकी १.५ लाख रुपये आहे. त्याने २, ५ आणि २० रुपयांच्या भारतीय नोटाही जमा केल्या आहेत. 

दिल्लीतील राहुल कौशिक यांच्या स्टॉलवर १९२२ ची पाच रुपयांची नोट आहे, ज्याची किंमत सुमारे ३५ हजार रुपये आहे. यासोबतच जॉर्ज पंचम, जॉर्ज सहावा यांच्यापासून आतापर्यंतच्या सर्व प्रकारच्या नोटा प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे लोकांना आकर्षित करण्यासाठी १०, ३५०, ५००, ५५० आणि १००० रुपयांची नाणीही येथे वापरली जात आहेत.

या प्रदर्शनात  ४९ मिलीग्राम सोन्याचे नाणे आहे. १० लाख मिलीग्राम म्हणजेच एक किलोग्रॅमचे चांदीचे नाणेही आहे.

Web Title: one rupee note equal to 10 lakh valuable rare currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.