इथे पतीच्या सर्व भावांशी लग्न करते एक महिला, आजही सुरू आहे ही परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 10:19 AM2022-10-07T10:19:18+5:302022-10-07T10:19:52+5:30
Weird Tradition : हिमाचल प्रदेशमध्ये ही प्रथा आजही पाळली जाते. चला जाणून घेऊया या आगळ्यावेगळ्या लग्न प्रथेबाबत...
Weird Tradition : महाभारतात ज्याप्रमाणे द्रोपदीने पाच पांडवांसोबत लग्न केले होते हे तुम्हाला माहीत आहे. याचप्रमाणे आजच्या काळातही एका महिलेने पाच भावांशी लग्न केलंय. हिमाचल प्रदेशमध्ये ही प्रथा आजही पाळली जाते. चला जाणून घेऊया या आगळ्यावेगळ्या लग्न प्रथेबाबत...
देहरादूनपासून काही अंतरावर असलेल्या एका गावात 21 वर्षीय रजोने पाच भावांशी लग्न केले. रजोने 2013 मध्ये या पाच भावांशी लग्न केले होते. अशाप्रकारे बहु पती प्रथा ही या भागात अनेक वर्षांपासून चालत आली आहे. अनेकांसाठी ही प्रथा विचित्र असेल पण हिमाचल आणि तिबेटमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी हे नवीन नाहीये. येथील परंपरेनुसार येथील मुलींना पतीच्या भावांसोबत लग्न करावं लागतं.
या भागात एकाच महिलेसोबत लग्न करण्याची प्रथा सुरु होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे या भागात महिलांची संख्याही कमी आहे. हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यात ही प्रथा आजही आहे.
यानुसारच रजोने पाच भावांशी लग्न केलंय. रजो आता काही मुलांची आई आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या मुलांचा वास्तविक पिता कोण आहे हे कुणालाही माहीत नाही. या परिवारात यावरुन कोणते वादही होत नाही. रजो आपल्या पाचही पतींसोबत आनंदी आहे. त्यासोबतच पाचही भाऊ रजोवर खूप प्रेम करतात. रजोला ही प्रथा बालपणापासून माहीत होती. कारण तिच्या आईचेही तीन पती होते. रजो आनंदी आहे कारण तिला तीन पतींचं प्रेम मिळतं.
कसं चालतं वैवाहिक जीवन?
लग्नानंतरचं वैवाहिक जीवन इथे एका टोपीवर निर्भर करतं. समजा लग्नानंतर कोणताही एक भाऊ पत्नीसोबत एकांतात असेल त्यावेळी खोलीबाहेर दरवाज्यावर एक टोपी ठेवतो. हे सगळे भाऊ मान मर्यादेचं इतकं भान ठेवतात की, दरवाज्यावर टोपी दिसली की जर कुणीही खोलीच्या आत जात नाहीत.
घराची प्रमुख असते महिला
येथील एक खास बाब म्हणजे इथे पुरुष नाहीतर महिला घरातील प्रमुख असतात. त्यांच्याकडे पती आणि मुलांची योग्यप्रकारे काळजी घेण्याची जबाबदारी असते. पत्नीला इथे गोयने असं म्हटलं जातं तर पतीला गोर्तेस म्हणतात.