ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; रस्त्यावर फिरत नाहीत, Video पोस्ट करून मागतात पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 05:20 PM2023-02-05T17:20:40+5:302023-02-05T17:23:03+5:30

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे भिकारी घरी बसून आपला उदरनिर्वाह करतात.

online begging trend indonesian beggars get on social media instead of wondering on street | ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; रस्त्यावर फिरत नाहीत, Video पोस्ट करून मागतात पैसे

ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; रस्त्यावर फिरत नाहीत, Video पोस्ट करून मागतात पैसे

googlenewsNext

गेल्या काही वर्षांत परिस्थिती किती बदलली आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. वीजबिलापासून ते भाजीपाला विक्रेत्यापर्यंत ऑनलाईन पेमेंट होऊ लागले आहे. मोबाईलवर फक्त कोड स्कॅन केल्याने सर्वात मोठे काम क्षणार्धात होते. अशा स्थितीत रस्त्यावर भीक मागणाऱ्यांना सुट्टे पैसे देण्याची वाट पाहावी लागणार नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एक अशी जागा आहे जिथे भिकारी रस्त्यावरची बसत नाहीत तर भीक मागण्यासाठी मोबाईलचा वापर करतात.

डिजिटल युगात लोक लहान-मोठी कामे ऑनलाईन करत आहेत, अशा परिस्थितीत रस्त्यावर बसण्याऐवजी ते ऑनलाईन भीक मागतात. आपण ऑनलाईन गिफ्ट दिले असेल, परंतु इंडोनेशियातील भिकारी देखील या बाबतीत मागे नाहीत. तिथे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे भिकारी घरी बसून आपला उदरनिर्वाह करतात.

घरी बसून फोनवरून मागा भीक 

भिकाऱ्यांच्या या युक्तीसाठी त्यांचे फोन आणि सोशल मीडिया हे त्यांचे साथीदार आहेत. त्याने टिकटॉकवर स्वतःचे अकाऊंट बनवले आहे, ज्यावर ते त्यांचे व्हिडीओ टाकतात आणि लोकांकडे भेटवस्तू आणि पैसे मागतात. त्यामुळे रस्त्यावरील धुळीचा सामना करावा लागत नाही. ते लोक स्वत: एक व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि सोशल मीडियावर टाकतात त्यानंतर पैसे मिळू लागतात. 

सरकारही यामुळे त्रस्त

भीक मागण्याच्या या अजब ट्रेंडमुळे सरकारही हैराण झाले आहे. अनेक देशांमध्ये सरकारने भीक मागण्यावर बंदी घातली आहे. ऑफलाइन व्यतिरिक्त येथे ऑनलाइन भीक मागण्यावरही बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे असे व्हिडीओ पोस्ट करून भिकारी पैसे कमावतात. इंडोनेशियामध्ये टिकटॉकचे 99.1 मिलियन युजर्स आहेत, ज्याने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. यामुळेच कंटेंट तयार करण्यापासून ते भीक मागण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी याचा वापर केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: online begging trend indonesian beggars get on social media instead of wondering on street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.