बोंबला! लॉकडाउन असूनही वाढले एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, टक्केवारी वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 10:24 AM2020-03-30T10:24:14+5:302020-03-30T10:26:06+5:30

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन असलं तरी लोकांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण वाढलं आहे.

Online extra marital affairs on the rise during coronavirus lockdown api | बोंबला! लॉकडाउन असूनही वाढले एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, टक्केवारी वाचून व्हाल अवाक्...

बोंबला! लॉकडाउन असूनही वाढले एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, टक्केवारी वाचून व्हाल अवाक्...

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. या व्हायरसला मात देण्यासाठी जगभरातील देशांसोबतच भारतातही लॉकडाउन करण्यात आलं आहे. हे लोकांमधील सोशल डिस्टंन्स कायम ठेवण्यासाठी केलं जातंय. त्यामुळे घरांमधील लोक आता पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून आहेत. 

काही लोक घरातूनच ऑफिसचं काम करत आहेत. तर काही लोक या वेळेचा आणि सुट्टीचा वापर ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्म आणि एक्स्ट्रा मॅरिटल डेटींग अ‍ॅपवर करत आहे. 

एका एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अ‍ॅपने नुकतंच एक स्टेटमेंट जारी केलं. ज्यानुसार, या अ‍ॅपचं सब्सक्रिप्शन 70 टक्क्यांनी वाढलं आहे.

कंपनीच्या स्टेटमेंटनुसार, या सब्सक्रिप्शन मागचं कारण आहे लोकांचं जास्तीत जास्त घरात राहणं आणि कोणत्याही प्रकारच्या संपर्कासाठी इंटरनेटचा वापर करणं.

अशा काळात लोकांना कंटाळा येणं साहजिक आहे. पण लोकांनी ऑनलाइन अफेअरवर वेळ घालवण्यापेक्षा काही पद्धतीने आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवला पाहिज.

अशात लोकांना घरात राहण्याचा आणि सोशल डिस्टेंसिंगचा फायदा घ्यायला पाहिजे. अनेक कामे सोबत केली पाहिजेत. एक्सपर्ट सांगतात की, एकत्र चांगला वेळ घालवल्याने नातं मजबूत होतं. 


Web Title: Online extra marital affairs on the rise during coronavirus lockdown api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.