विक्री होतेय Fake virginity ची, १५ मिनिटात वर्जिन बनवत असल्याचा दावा...लग्न झालेल्या मुलीही वर्जिन होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 04:23 PM2022-02-10T16:23:16+5:302022-02-10T16:48:08+5:30

फेक व्हर्जिनिटीही (Fake Virginity) मिळत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. फेक व्हर्जिनिटीची ऑनलाईन विक्री होत असल्याची चर्चा आहे.

online fake virginity selling plastic hymens filled with blood | विक्री होतेय Fake virginity ची, १५ मिनिटात वर्जिन बनवत असल्याचा दावा...लग्न झालेल्या मुलीही वर्जिन होणार

विक्री होतेय Fake virginity ची, १५ मिनिटात वर्जिन बनवत असल्याचा दावा...लग्न झालेल्या मुलीही वर्जिन होणार

Next

२१ व्या शतकात लोक कितीही पुढारलेले असले तरी काही जुन्या चुकीच्या प्रथा, रूढी, गैरसमज मात्र ते सोडायला तयार नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे मुलींची व्हर्जिनिटी म्हणजे मुलीचं क्रोमार्य (Girls Virginity). आजही यावरून मुलींना खूप काही सहन करावं लागतं. आजही मुलींची व्हर्जिनिटी एक चिंतेचा विषय ठरत आहे आणि याचा फायदा कंपन्याही घेत आहेत. आता तर काय फेक व्हर्जिनिटीही (Fake Virginity) मिळत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. फेक व्हर्जिनिटीची ऑनलाईन विक्री होत असल्याची चर्चा आहे.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्लॅस्टिक हाइमनची (Plastic Hymen On Sale) विक्री केली जाते आहे. हाइमन हा महिलांच्या प्रायव्हेट पार्टच्या आत असलेली एक पातळ त्वता आहे. जेव्हा पहिल्यांदाच शारीरिक संबंध होतात तेव्हा ही त्वचा फाटते आणि त्यातून रक्त येतं, असं सांगितलं जातं. यावरूनच मुलीची क्रोमार्य चाचणी होते. म्हणजे त्या मुलीने याआधी सेक्स केला आहे की नाही हे समजतं. पण खरंतर सेक्सशिवाय हाइमन तुटण्याची अनेक कारणं आहेत. पण लोक याचा संबंध फक्त सेक्सशीच जोडतात. जर लग्नानंतर सेक्स केल्यावर मुलीचा रक्तस्राव झाला नाही तर तिने लग्नाआधी दुसऱ्या कुणासोबत तरी शारीरिक संबंध ठेवले असा आरोप तिच्यावर केला जातो.

त्यामुळे आता ऑनलाइन मिळणाऱ्या या प्लॅस्टिक हाइमनकडे मुलींचा कलही वाढला आहे. महिला ही हाइमन खरेदी करत आहेत. ही नकली हाइमन प्लॅस्टिकच्या कॅप्सूलमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये बनावट रक्त भरलेलं असतं. हे कॅप्सुल प्रायव्हेट पार्टच्या आत टाकलं जातं. जेव्हा सेक्सदरम्यान आत दाब पडतो तेव्हा हे कॅप्सूल फुटतं आणि त्यातून रक्त येतं. ज्यामुळे सेक्सदरम्यान मुलीचा रक्तस्राव झाला यामुळे ती व्हर्जिन आहे, असं तिच्या पार्टनरला वाटतं. आजच्या प्रगत युगात अशा या बनवाट हाइमनच्या विक्रीमुळे लोक हैराण झाले आहेत.

याची किंमत जवळपास ३ हजार २०० रुपये आहे. अवघ्या १५ मिनिटांत व्हर्जिन बनवणार असा दावा करत हे हाइमन विकले जात आहेत. भारतातही हे प्रोडक्ट विकलं जात होतं पण २०१९ मध्ये अमेझऑनवरून ते हटवण्यात आलं.

Web Title: online fake virginity selling plastic hymens filled with blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.