थेट चंद्रावर अस्थी दफन करण्यात आलेली जगातली एकमेव व्यक्ती कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 02:25 PM2019-12-31T14:25:58+5:302019-12-31T14:26:07+5:30

ते नेहमी एका अंतराळ यानात बसण्याचं आणि चंद्रावर चालण्याचं स्वप्न बघत होते. पण त्यांना हे स्वप्न पूर्ण करण्याची कधी संधीच मिळाली नाही.

The Only Man To Be Buried On the Moon | थेट चंद्रावर अस्थी दफन करण्यात आलेली जगातली एकमेव व्यक्ती कोण आहे?

थेट चंद्रावर अस्थी दफन करण्यात आलेली जगातली एकमेव व्यक्ती कोण आहे?

Next

जगभरात असे अनेक महान वैज्ञानिक झाले ज्यांनी त्यांच्या संशोधनातून मानवी जीवनासाठी आणि विज्ञानासाठी मोठं योगदान दिलं. त्यांचं काम पुढील अनेक शतके लक्षात ठेवलं जाईल. यातीलच काही वैज्ञानिकांपैकी एक होते यूजीन मर्ले शूमेकर.

यूजीन शूमेकर यांनी कित्येक अंतराळवीरांना प्रशिक्षित केलं. २० एप्रिल १९२८ मध्ये जन्मलेले यूजीन २०व्या शतकातील महान वैज्ञानिकांपैकी एक होते. त्यांच्या योगदानासाठी त्यांना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज, एच डब्ल्यू बुश यांनी विज्ञानाच्या राष्ट्रीय पदकाने सन्मानित केले होते.

यूजीन यांना एरिजोनामध्ये बॅरिंजर मेटिओर क्रेटर(उल्का पिंडाचा खड्डा)च्या संशोधनासाठीही ओळखलं जात होतं. त्यासोबतच ते संयुक्त राज्य भूवैज्ञानिक सर्व्हेक्षणचे खगोल भूविज्ञान अनुसंधान कार्यक्रमाचे पहिले निर्देशकही होते. त्यांचं पहिलं मिशन यूटा आणि कोलोराडोमध्ये यूरेनियमचा भांडार शोधणं हे होतं. त्यानंतर  त्यांचं दुसरं मिशन हे ज्वालामुखीच्या प्रक्रियांचा अभ्यास करणं हे होतं. 

यूजीन यांनी पृथ्वीवरून चंद्राबाबत भरपूर अभ्यास केला. ते नेहमी एका अंतराळ यानात बसण्याचं आणि चंद्रावर चालण्याचं स्वप्न बघत होते. पण त्यांना हे स्वप्न पूर्ण करण्याची कधी संधीच मिळाली नाही. एका गंभीर आजारामुळे त्यांचं अंतराळवीर होण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं. पण नासाने १९९७ मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. नासाने त्यांच्या अस्थी चंद्रावर दफन केल्या. हा मान मिळवणारे ते जगातले एकुलते एक व्यक्ती आहेत.

यूजीन शूमेकर यांचं निधन १९९७ मध्ये एका कार अपघातात झालं होतं. या दुर्घटनेत त्यांची पत्नी कॅरोलीन जीन स्पेलमॅन शूमेकर गंभीर जखमी झाल्या होत्या. त्या सुद्धा एक वैज्ञानिक आहेत. आता त्यांचं ९० वर्षे आहे.


Web Title: The Only Man To Be Buried On the Moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.