आश्चर्य! भारतातील असं एकमेव मंदिर जिथे देवी मातेला अर्पण केला जातो 'चपलांचा हार'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 02:13 PM2021-05-27T14:13:26+5:302021-05-27T14:18:48+5:30
देशात एक असंही मंदिर आहे जिथे देवाला प्रसाद नाही तर चपलांचा हार अर्पण केला जातो. अर्थातच यावर अनेकांना विश्वास बसला नसेल. पण हे सत्य आहे.
हिंदू धर्माच्या मान्यतांनुसार, जेव्हाही आपण मंदिरात जातो तेव्हा देवासाठी प्रसाद आवर्जून नेतो. फूल आणि इतरही काही वस्तू देवाला अर्पण करतो. देशातील वेगवेगळ्या मंदिरात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू देवाला चढवल्या जातात. मंदिरात गेल्यावर गेटच्या बाहेरच चपला काढून ठेवाव्या लागतात. पण देशात एक असंही मंदिर आहे जिथे देवाला प्रसाद नाही तर चपलांचा हार अर्पण केला जातो. अर्थातच यावर अनेकांना विश्वास बसला नसेल. पण हे सत्य आहे. भारतात एक देवीचं असं मंदिर आहे जिथे चपलांचा हार अर्पण केला जातो.
कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यात 'लकम्मा देवी'चं प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी एक जत्रा भरते. यादरम्यान दूरूदुरून भाविक लकम्मा मातेचं दर्शन करण्यासाठी येतात. हे भाविक देवीला चपलांचा हार अर्पण करतात. या फेस्टिव्हलमध्ये मुख्यत्वे गोला नावाच्या गावातील लोक जास्त करून येतात. याला फुटवेअऱ फेस्टिव्हलही म्हटलं जातं.
यादरम्यान ज्या भक्तांच्या पायात आणि गुडघ्यांमध्ये वेदना असतात ते इथे मोठ्या प्रमाणात चपलांचे हार अर्पण करतात. असे मानले जाते की, असं केल्याने देवी माता त्यांची ही वेदना नेहमीसाठी दूर करते. असेही म्हटले जाते की, या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण होते. (हे पण वाचा : भारतीय नाण्यांवर वर्षाच्या खाली डॉट, स्टार अशी चिन्हे का असतात? जाणून घ्या अर्थ.....)
या मंदिराची जुनी मान्यता आहे की, जर लकम्मा देवीला चपलांचा हार अर्पण केला तर ती याने प्रसन्न होते. आणि वाईट शक्तींपासून भाविकांची सुरक्षा करते. मान्यता अशीही आहे की, देवी माता भाविकांनी अर्पण केलेल्या चपला रात्री घालून फिरते आणि त्यांची रक्षा करते.