अरे व्वा! देशात 'या' ठिकाणी वसलंय 'पेन्सिल व्हिलेज'; जाणून घ्या, नावामागची रंजक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 04:35 PM2022-03-25T16:35:29+5:302022-03-25T16:39:01+5:30

Pencil Village : झेलम नदीच्या काठावर वसलेल्या या गावातील घरे कारखान्यांनी वेढलेली आहेत. पण, या गावात फक्त 250 लोक राहतात आणि ते पेन्सिल व्हिलेज म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे.

ookhu village of pulwama in kashmir is called as pencil village | अरे व्वा! देशात 'या' ठिकाणी वसलंय 'पेन्सिल व्हिलेज'; जाणून घ्या, नावामागची रंजक गोष्ट

फोटो - kashmirlife

Next

नवी दिल्ली - काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात ओखू हे गाव (Ookhu Village) आहे. झेलम नदीच्या काठावर वसलेल्या या गावातील घरे कारखान्यांनी वेढलेली आहेत. पण, या गावात फक्त 250 लोक राहतात आणि ते पेन्सिल व्हिलेज म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. या गावात पेन्सिलसाठी स्लेट मॅन्युफॅक्चरिंगची तीन युनिट्स आहेत जी पेन्सिल निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून वापरली जातात. मात्र, दहा वर्षांपूर्वी येथे असे एकही युनिट नव्हते. पण आज या गावाचा पेन्सिल निर्मिती उद्योगात खूप महत्त्वाचा आणि मोठा वाटा आहे. 

गावातील सर्वात जुने स्लेट उत्पादन युनिट 2013 मध्ये स्थापन करण्यात आले. काश्मीर लाइफच्या म्हणण्यानुसार, झेलम एग्रो इंडस्ट्रीजच्या आधी इथून जम्मू आणि चंडीगडला लाकूड पाठवले जायचे. झेलम एग्रो इंडस्ट्रीजचे प्रमोटर मंजरू अहमद अलई यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी ते हिंदुस्थान पेन्सिलला हे पाठवत असत. लाकूड व्यापार्‍याचा मुलगा अलईच्या कुटुंबाला आपली जमीन विकावी लागली जेव्हा त्याच्या कुटुंबाने युनिट उघडण्याचा विचार केला. 

2012 मध्ये, तो जम्मूमध्ये पेन्सिल निर्मात्यांना भेटला आणि तेथे अलईने त्याला पेन्सिलसाठी कच्चा माल देण्यास सांगितले. येथून या मोठ्या बदलाचा पाया रचला गेला. पेन्सिल उद्योगासाठी कच्च्या मालाची गरज वाढली. त्यामुळे हळूहळू संपूर्ण कुटुंब पेन्सिलसाठी कच्चा माल तयार करण्यात गुंतले, त्यानंतर अलईने त्याच्या युनिटमध्ये 15 स्थानिक लोकांना रोजगार दिला. त्याला जनरेटर बसवण्यासाठी जम्मू-काश्मीर बँकेकडून कर्ज मिळाले. पुरवठा करण्यात येणारा कच्चा माल अतिशय दर्जेदार आणि स्वस्त होता. यानंतर इथेच पेन्सिल स्लेट बनविण्याची चर्चा सुरू झाली. 

पेन्सिल बनवण्याचे अर्धे काम म्हणजे त्याचा प्लांट बसवण्याची चर्चा होती. ही स्लेट एक लाकडी बार आहे ज्यापासून चार पेन्सिल बनवता येतात. एक युनिट उभारण्यासाठी 2 कोटी खर्च येतो. बचतीतून यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेतले गेले आणि हळूहळू संपूर्ण गाव पेन्सिल स्लेटच्या निर्मितीमध्ये गुंतले. काश्मीरमधील चिनार वृक्षांचे लाकूड पेन्सिलसाठी कच्चा माल म्हणून अतिशय योग्य आहे. काश्मीरमध्ये चिनाराची झाडे मुबलक प्रमाणात आहेत. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: ookhu village of pulwama in kashmir is called as pencil village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.