Optical Illusion: भरपूर साऱ्या Q मध्ये हळूच लपून बसलाय एक O ... पाहा तुम्हाला शोधता येतोय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 05:08 PM2024-02-23T17:08:46+5:302024-02-23T17:15:24+5:30
तुम्हाला ७ सेकंदात या फोटोतील इंग्रजी अक्षर O शोधून काढायचे आहे
Optical Illusion, Find O in Q : आपले मन आणि डोळे दोन्ही तीक्ष्ण ठेवण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजन हा एक मजेदार मार्ग आहे. हा भ्रम फोटो, चित्रे किंवा स्केचच्या कोणत्याही स्वरूपात असू शकतो. काही ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या मेंदूला चालना देत असते. काही वेळा असे फोटो तुमचे निरीक्षण कौशल्य आणि IQ तपासतात. अशी चित्रे दिसतात तितकी साधी नसतात. किंबहुना, या चित्रांमध्ये दिलेल्या चॅलेंजचे गूढ उकलताना भल्याभल्यांनाही घाम फुटतो. आज आम्ही तुमच्यासाठी असंच एक मजेदार 'ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट' घेऊन आलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला ७ सेकंदात या फोटोतील इंग्रजी अक्षर O शोधून काढायचे आहे.
काही गोष्टी अगदी सामान्य दिसतात, परंतु त्यांचे वास्तव वेगळे असते. अशी छायाचित्रे अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. असे फोटो आपल्याला काही प्रमाणात गोंधळात टाकतात. पण या फोटोंमधून तुमच्या निरीक्षणक्षमतेचा कस लागतो. या फोटोत इंग्रजी वर्णमालेतील बरेच Q दिसत असतील. पण त्यात अतिशय सराइतपणे एक O देखील लपला आहे. तुम्हाला तो अवघ्या ७ सेकंदात शोधायचा आहे.
तुमची दृष्टीही अप्रतिम आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे आव्हान स्वीकारू शकता. प्रामाणिकपणे सांगायचे तर, O शोधण्यासाठी तुम्हाला ५ ते ७ सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागू नये असे तज्ज्ञ सांगतात. पण तरीही तुम्हाला Q मधील O ओळखता येत नसेल, तर खाली दिलेले उत्तर नक्की पाहा.