Optical Illusion : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय? सत्य बघून बसणार नाही विश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 04:54 PM2023-05-27T16:54:22+5:302023-05-27T17:00:36+5:30

Optical Illusion : रेडिट पेज @opticalillusions वर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टला कॅप्शन देण्यात आलं आहे की, 'हा पक्षी नाहीये. पुन्हा एकदा बघा'. या फोटोत एक पक्षी दिसत आहे.

Optical Illusion : Do you see a bird in this pic truth will not be believed | Optical Illusion : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय? सत्य बघून बसणार नाही विश्वास!

Optical Illusion : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय? सत्य बघून बसणार नाही विश्वास!

googlenewsNext

Optical Illusion : सोशल मीडिया अनेक किस्से, व्हिडीओ आणि ऑप्टिकल इल्यूजन फोटोंचा भांडार आहे. खासकरून ऑप्टिकल इल्यूजन लोकांचं अधिक लक्ष वेधून घेतात. डोकं चक्रावून सोडणारे रहस्य, गुपित सॉल्व करण्यात एक वेगळीच मजा येते. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या लोकांना हैराण करत आहे. 

रेडिट पेज @opticalillusions वर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टला कॅप्शन देण्यात आलं आहे की, 'हा पक्षी नाहीये. पुन्हा एकदा बघा'. या फोटोत एक पक्षी दिसत आहे. पण मुळात तो पक्षी नाहीये. तुम्ही म्हणाल ही काय गंमत लावलीये. पण जेव्हा तुम्ही फोटो बारकाईने बघाल तेव्हाच तुम्हाला सत्य कळेल.

     This is not a bird. Look again.
by      u/EndersGame_Reviewer in      opticalillusions    

तुम्ही बारकाईने फोटो बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, फोटोत पक्षी नाही तर पक्ष्याची आकृती आहे. एका व्यक्तीला पेंट केलं आहे आणि त्याला तशी पोज द्यायला लावली आहे. त्याने पक्ष्यासारखी पोज दिली आहे.

हा फोटोत या रेडिटवर तीन दिवसांआधी शेअर करण्यात आला होता. पोस्ट करण्यात आल्यावर याला जवळपास 300 पेक्षा जास्त अपवोट मिळाले आहेत. तसेच पोस्टवर अनेक कमेंट्सही येत आहेत. जास्तीत जास्त लोक फोटो पाहून हैराण झाले आहेत.

Web Title: Optical Illusion : Do you see a bird in this pic truth will not be believed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.