६ मुली अन् फक्त ५ पाय? बहुत ना इन्साफी है! मग शोधा या फोटोत ६व्या मुलीचे पाय कुठेयत ते...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 05:35 PM2022-04-10T17:35:13+5:302022-04-10T17:40:27+5:30

आतापर्यंत तुम्ही असे अनेक फोटो पाहिले असतील, निरिक्षणही केलं असेल. पण, हा नवा फोटो तुम्हाला भांबावून सोडेल असाच आहे. 

Optical Illusion of Six Women With Five Pairs of Legs Puzzles All | ६ मुली अन् फक्त ५ पाय? बहुत ना इन्साफी है! मग शोधा या फोटोत ६व्या मुलीचे पाय कुठेयत ते...

६ मुली अन् फक्त ५ पाय? बहुत ना इन्साफी है! मग शोधा या फोटोत ६व्या मुलीचे पाय कुठेयत ते...

Next

ऑप्टीकल इल्यूजन म्हणजे नेमकं काय हे आता तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून असे बरेच फोटो आपल्यासमोर आले आहेत, जिथं तुमच्या निरिक्षण शक्तीचीही परीक्षा पाहिली गेली असावी. आतापर्यंत तुम्ही असे अनेक फोटो पाहिले असतील, निरिक्षणही केलं असेल. पण, हा नवा फोटो तुम्हाला भांबावून सोडेल असाच आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एका सोफ्यावर ६ मुली बसलेल्या दिसत आहेत. इथवर सगळं ठीक. पण, जेव्हा तुम्ही सोफ्याच्या खालच्या बाजूला अर्थात या मुलींच्या पायांकडे पाहता तेव्हा हे गौडबंगाल कळतं.  सोफ्यावर ६ मुली दिसत असल्या तरीही तिथं पाय मात्र पाचच मुलींचे दिसत आहेत. आता हे शक्य कसं, हाच विचार करुन अनेकांचं डोकं चक्रावलं आहे. 

काहींच्या मते फोटो मॉर्फ करत त्यातून सहाव्या मुलीचे पाय हटवण्यात आले आहेत. पण, कोणीच हे ठाम उत्तर देऊ शकलेलं नाही, की या सहाव्या मुलीचे पाय नेमके कुठे गेले. 

फोटोमागचं खरं सत्य काय ? 
काहींनी हा फोटो पाहिल्यानंतर ही मुलगी बिनपायांची होती का, असा प्रश्नही केला. तुम्ही फोटो नीट पाहिल्यास लक्षात येईल, की सोफ्यावर ५ मुली बसल्या आहेत. सहावी मुलगी सोफ्याच्या हँडरेस्टवर बसली आहे. चार मुली पाय एकावर एक ठेवून बसल्या आहेत. सोफ्यावर असणाऱ्या या पाच मुलींपैकी मधल्या मुलीचे पाय दिसत नसल्याचं लक्षात येतंय. 

तर, आता पायांच्या मोजणीमध्ये तुम्हीही गोंधळून गेला असाल तर हा फोटो पाहा. इथं व्यवस्थित कोणत्या मुलीचे पाय नेमके कुठे आहेत हे दाखवण्यात आलं आहे. काही कळतंय का? 

Web Title: Optical Illusion of Six Women With Five Pairs of Legs Puzzles All

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.