बघुया तुमची नजर किती तीक्ष्ण? या उभ्या काळ्या-पांढऱ्या रेषांमध्ये काय दडलंय ते ओळखा पाहु

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 02:14 PM2022-02-06T14:14:19+5:302022-02-06T14:19:07+5:30

एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चांगलाच चर्चेत आला आहे. एखाद्या बारकोडसारखा हा फोटो आहे.

optical illusion photo find cat in white and black standing lines | बघुया तुमची नजर किती तीक्ष्ण? या उभ्या काळ्या-पांढऱ्या रेषांमध्ये काय दडलंय ते ओळखा पाहु

बघुया तुमची नजर किती तीक्ष्ण? या उभ्या काळ्या-पांढऱ्या रेषांमध्ये काय दडलंय ते ओळखा पाहु

Next

सोशल मीडियावर असे बरेच फोटो व्हायरल होत असतात (Opticall illusion photos) जे पाहून तुम्ही कन्फ्युझ होता. काही फोटो विचित्र आकार असतो किंवा विचित्र डिझाइन असते. ज्यामध्ये काही ना काही दडलेलं असतं. याला ऑप्टिकल इल्युझन असं म्हणतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चांगलाच चर्चेत आला आहे. एखाद्या बारकोडसारखा हा फोटो आहे.

या फोटोत फक्त काळ्या-पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसत आहेत (White Black lines photo showing optical illusion). तसं या फोटोत तुम्हाला काय खास दिसतं आहे असं विचारलं तर तुम्ही फक्त या रेषाच तर आहेत, यात कुठे काय खास आहे, असंच म्हणाल. पण नाही या काळ्या-पांढऱ्या रेषांमध्ये मोठा राज डला आहे. तुम्ही जर नीट आणि एका खास पद्धतीने फोटो पाहाल तर तुमच्यासमोर हा राज उलगडेल.

आता एरवी तुमच्यासमोर असा विचित्र फोटो आला की त्या फोटोकडे तुम्हाला एकटक पाहायचं असतं, तेव्हा तुम्हाला त्यात काहीतरी वेगळं दिसतं आहे. या फोटोत तुम्ही तसं एकटक पाहिलं तर तुम्हाला काहीच दिसणार नाही. या फोटोकडे स्थिर नजरेने पाहूच नका. तर तुमचं डोकंल हलवा (Shaking Head lets you see optical illusion). आपण जशी नकारार्थी मान हलवतो, तशीच मान तुम्हाला हलवायची. डाव्या-उजव्या बाजूला डोकं हलवायचं आहे आणि मग पाहा चमत्कार.

हळूच या काळ्या-पांढऱ्या रेषांमधून दोन डोळे तुमच्याकडे पाहतील आणि हळूहळू दोन कान आणि चेहराही दिसू लागेल. आता तुम्हाला तो चेहरा स्पष्टपणे दिसेल. दिसला हा चेहरा कुणाचा आहे. याचं उत्तर आधी तुम्ही आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट ब़ॉक्समध्ये नक्की द्या.

द सन वेबसाईटच्या रिपोर्टनुसार डॉक्टर मिशैल डिकिन्सन यांनी २०१९ साली पहिल्यांदा हा फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. तेव्हा बहुतेक लोक हा फोटो पाहून हैराण झाले होते. आता या फोटोत नेमकं काय आहे हे तुम्हीसुद्धा जाणून घ्या. या फोटोत आहे तो चक्क एका मांजराचा चेहरा. काय मग तुम्हालाही तोच दिसला नाही. आता या फोटोचं चॅलेंज तुम्ही तुम्ही इतरांनाही द्या. ही बातमी नक्की शेअर करा.

Web Title: optical illusion photo find cat in white and black standing lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.