या फोटोत तुम्हाला सर्वप्रथम काय दिसले? उत्तरावरुन कळेल तुमच्या लव्हलाईफचं सिक्रेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 07:47 PM2022-04-15T19:47:37+5:302022-04-15T19:50:39+5:30
एक असा फोटो समोर आला आहे, जो पाहताना प्रेमाबद्दल बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत. हा फोटो म्हणजे मेक्सिकोच्या octavio ocampo यानं काढलेली एक पेंटिंग.
optical illusion reveals what you are like in love एक फोटो तुमच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक गुण सांगतो यावर तुमचा कितपत विश्वास आहे ? यावर तुमचा जास्त विश्वास असेल किंवा नसेलही पण, अनेकदा ही बाब खरी ठरते आणि हे अंदाजही आपल्याला थक्क करुन जातात. सध्या यामध्येच एक असा फोटो समोर आला आहे, जो पाहताना प्रेमाबद्दल बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत. हा फोटो म्हणजे मेक्सिकोच्या octavio ocampo यानं काढलेली एक पेंटिंग.
Yourtango च्या माहितीनुसार rebecca jane stokes या लेखकांनी हे चित्र उलगडून सांगितलं आहे. या फोटोमध्ये दिसणारे 4 घटक तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून सांगतात.
तुम्हाला आधी घोडा दिसतोय का ?
घोडेस्वारी करणाऱ्या इसमावर तुमची नजर पडत असल्याच तुम्हाला नियंत्रणात आणणं कठीण असेल असं सांगण्यात येत आहे. किंबहुना जोडीदार मिळूनही तुमचा शोध काही संपलेला नसतो.
सर्वात आधी वयोवृद्ध व्यक्ती दिसल्यास...
असं झाल्यास तुम्ही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहात हे कळतं. जीवनातील अनेक भौतिक सुखांच्याही पलीकडे तुम्हाला प्रेम महत्त्वाचं असतं याचा हा इशारा.
नदीकिनारी झोपलेली मुलगी...
तुम्हाला हे चित्र, फोटो पाहताना नदीकिनारी एक मुलगी झोपलेली दिसल्यास यापूर्वी तुमचा प्रेमाच्या बाबतीत अनुभव फारसा चांगला नसल्याचं स्पष्ट होतं. असं असूनही प्रेमाच्या बाबतीत तुम्ही शरणागती पत्करताना दिसत नाही.
वाहणारी नदी दिसल्यास...
चित्र पाहताना पहिल्या नजरेत तुम्हाला वाहती नदी दिसल्यास तुम्ही प्रेमासाठी तयार आहात पण, मनाजोगती व्यक्ती तुम्हाला साथ देत नाहीये हे स्पष्ट होतं. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही इतरांहून वेगळे आहात हेच इथे स्पष्ट होतं.