Optical Illusion: फोटोमध्ये लपला आहे ससा, ९९ टक्के लोक शोधण्यात ठरले अपयशी, बघा तुम्हाला दिसतो का...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:49 PM2022-04-15T12:49:57+5:302022-04-15T14:39:01+5:30
Optical Illusion Images: ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांना चकवा देणाऱ्या फोटोंना पाहताना अनेकदा आपले डोळे फसतात. आज समोर आलेल्या फोटोमध्ये दगडांमध्ये एक ससा लपलेला आहे. मात्र या सशाचा शोध घेण्यासाठी तुमच्याकडे चाणाक्ष बुद्धीसोबत तीक्ष्ण नजर असणे आवश्यक आहे.
मुंबई - ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांना चकवा देणाऱ्या फोटोंना पाहताना अनेकदा आपले डोळे फसतात. आज समोर आलेल्या फोटोमध्ये दगडांमध्ये एक ससा लपलेला आहे. मात्र या सशाचा शोध घेण्यासाठी तुमच्याकडे चाणाक्ष बुद्धीसोबत तीक्ष्ण नजर असणे आवश्यक आहे. कारण हा ससा शोधून काढण्यामध्ये बहुतांश लोक अपयशी ठरत आहेत.
हा फोटो दगडांनी भरलेला आहे. या दगडांमध्ये एक ससा लपलेला आहे. हा ससा तुम्ही शोधून काढला पाहिजे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, बहुतांश लोक हे सशाला शोधण्यामध्ये अपयशी ठरत आहेत. मात्र हा ससा अगदी समोर दिसत असूनही तो स्पष्ट दिसत आहे. मात्र केवळ काही काही लोकच आहेत, जे या सशाला अगदी सहजपणे शोधून काढले आहेत. सोशल मीडिया युझर्स अशा लोकांना जिनियसची उपमा दिली जात आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये तुम्हाला दगडगोट्यांनी आच्छादलेला एक भाग दिसत आहे. यामध्ये काही ठिकाणी गवत उगवलेले दिसत आहे. मात्र खूप बारीक लक्ष देऊन पाहिले तरी त्यात ससा दिसत नाही आहे. काही जणांना वारंवार पाहूनही यातील प्राणी दिसत नाही आहे.
जर तुम्हाला आतापर्यंत लपलेला ससा दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला तो ससा कुठे लपलेला आहे हे सांगतो. सुरुवातीला तुम्ही फोटोच्या मध्यावर लक्ष केंद्रित करा. आता तुम्हाला दगडांच्यामध्ये मोठे छिद्र दिसेल. या छिद्राच्या बाजूलाच हा ससा लपलेला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याचे डोळे तुम्हालाच पाहत आहेत. आता हा फोटो तुमच्या मित्रपरिवाराला पाठवून त्यांच्याही चाणाक्ष नजरेची परीक्षा घ्या.