4 वर्षांत करोडपती बनला सामान्य टॅक्सी ड्रायव्हर, श्रीमंत होण्यासाठी वापरली अशी TRICK!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 10:15 AM2023-06-08T10:15:15+5:302023-06-08T10:18:13+5:30

या व्यक्तीने पैसे जमवून स्वतःचीच कंपनी सुरू केली आहे.

Ordinary taxi driver became a millionaire in 4 years, thie TRICK used to get rich Taxi driver now millionaire businessman | 4 वर्षांत करोडपती बनला सामान्य टॅक्सी ड्रायव्हर, श्रीमंत होण्यासाठी वापरली अशी TRICK!

4 वर्षांत करोडपती बनला सामान्य टॅक्सी ड्रायव्हर, श्रीमंत होण्यासाठी वापरली अशी TRICK!

googlenewsNext

एक व्यक्ती सामान्य टॅक्सी ड्रायव्हर होती. मात्र आता कोट्यधीश झाली आहे. या व्यक्तीने पैसे जमवून स्वतःचीच कंपनी सुरू केली आहे. सलीम अहमद खान असे या व्यक्तीचे नाव आहे. सलीम खान पाकिस्तानातील रहिवासी आहे. तो 2009 ला यूएईमध्ये एक टॅक्सी चालक म्हणून आला. आता तो कोट्यधीश झाला आहे.

खलीजा टाइम्सच्या वृत्तानुसार, सलीम खानने 2013 पर्यंत टॅक्सी चालवली. त्याने ऊबरसाठी काम केले आणि 2019 पर्यंत येथे पैसा कमावला. आता त्याने 850 ड्रायव्ह असलेली फ्लिट कंपनी सरू केली आहे. याची सेवा संपूर्ण यूएईमध्ये दिली जात आहे. या कंपनीची सुरुवात केवळ 20 टॅक्सींपासून करण्यात आली. तो सांगतो की, त्याने 2013 च्या मध्यापर्यंत एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले. यानंतर, लक्झरी लिमोसिन टॅक्सी सर्व्हिससोबत2019 पर्यंत ड्रायव्हर म्हणून काम केले.'

कोट्यवधींचा बिझनेस -
सलीम खान मूळचा लाहोर येथील आहे. तो अवघ्या चार वर्षांतच कोट्यधीश बनला आहे. 2009 मध्ये तो UAE मध्ये आला होता. त्यावेळी एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणून त्याला महिन्याला 5,000 दिरहम (अंदाजे 1,12,267 रुपये) मिळत होते. आज त्याचा 5 मिलियन दिरहमचा (सुमारे 11 कोटी रुपये) बिझनेस आहे. कोरोनाची लाट याण्यापूर्वीचे वर्ष खानसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. या काळात त्याला भरपूर यश मिळाले. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
 
खान 12-12 तास आणि केव्हा केव्हा तर याहूनही अधिक वेळ काम करत होता. 2013 मध्ये त्याने स्वतःची लिमोसीन विकत घेतली. तो जेवढा पैसा कमवत होता. तेवढाही आपल्या बिझनेसमध्ये इव्हेस्ट करत होता. यानंतर 2019 मध्ये त्याने किंग रायडर्स डिलिव्हरी सर्व्हिसेस नावाने स्वतःची कंपनी सुरू केली. त्याच्या कडे 850 कर्मचारी आहेत. याच बरोबर तो आणखी एक लक्झरी ट्रान्सपोर्ट कंपनीही सुरू करत आहे. त्याने 20 गाड्यांची ऑर्डरही दिली आहे. तसेच स्टाफला ट्रेनिंगदेखील दिली जात आहे. 2023 च्या अखेरपर्यंत फ्लीट 100 वर नेण्याची योजना आहे.

 

Web Title: Ordinary taxi driver became a millionaire in 4 years, thie TRICK used to get rich Taxi driver now millionaire businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.