बापरे, समुद्री शिंपल्यांमध्येही ओसामा! फेरफटका मारत असताना आढळला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 02:00 AM2019-10-27T02:00:00+5:302019-10-27T02:00:13+5:30
तुम्हाला मानवी चेहºयाशी साम्य असलेला शिंपला नेहमी आढळतोच असे नाही. त्यातही ओसामा बिन लादेन सापडणे हे गंमतशीर आहे.
एका ब्र्रिटीश महिलेस समुद्रकिनाऱ्यावर आढळलेला शिंपला हुबेहुब ओसामा बिन लादेन याच्या चेहºयासारखा होता. डेब्रा आॅलिव्हर (वय ६० ब्रेंटफोर्ड, वेस्ट लंडन) यांना विंचेलसी गावाजवळ हा शिंपला दिसला. इंग्लंडच्या इस्ट स्युसेक्स जवळ हे गाव आहे.
पती मार्टिन(६२) यांच्यासोबत समुद्रकिनाºयावरुन त्या फेरफटका करत होत्या. डेब्रा या विधी विभागात सचिवपदी आहेत. तेव्हा वाळूमध्ये काही तरी चमचमणारे दिसल्याने डेब्रा यांची नजर शिंपल्यावर गेली. त्यांनी तो उचलला. त्यावेळी शिंपल्याची आकृती आणि लादेन यांच्या चेहºयात साम्य असल्याचे जाणवले. त्यांना हसू रोखता आले नाही. डोक्यावर एक पगडी दिसली. तळहातावरुन ओसामा बिन लादेन आपल्याकडे पाहात आहे, असे जाणवले.
तुम्हाला मानवी चेहºयाशी साम्य असलेला शिंपला नेहमी आढळतोच असे नाही. त्यातही ओसामा बिन लादेन सापडणे हे गंमतशीर आहे. लादेन याला समुद्राच्या तळाशीच पुरण्यात आले आहे, हाही एक योगायोग. आम्ही समुद्रकिनाºयावर फिरावयास गेलो होतो. तेथे अब्जावधी शिंपले आणि गारगोट्या होत्या. लोकांना मात्र हा शिंपला लादेन सदृश्य वाटत असला तरी काही जणांना इराणचा दिवंगत नेता अयातुल्ला खोमेनी यांच्यासारखा वाटत आहे, असे त्या सांगतात.
लादेन हा अल कैदा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक होता. त्याने अनेक दहशतवादी हल्ले घडविले. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ११ सप्टेंबर २००१ रोजी त्यानेच विनाशकारी हल्ला केला. लादेन यास २ मे २०११ रोजी पाकिस्तानमध्ये ठार करण्यात आले.